बारामती बंद करण्याऐवजी आपल्या करामती बंद करा, भाजपाचा पवारांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:08 PM2019-09-25T13:08:18+5:302019-09-25T13:09:18+5:30

महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Baramati Bandh : BJP Leader Avdhoot Wagh Attack on NCP | बारामती बंद करण्याऐवजी आपल्या करामती बंद करा, भाजपाचा पवारांना टोला 

बारामती बंद करण्याऐवजी आपल्या करामती बंद करा, भाजपाचा पवारांना टोला 

Next

मुंबई -  महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर दाखल गुन्हाविरोधात आज बारामती बंदीची हाक देण्यात आली होती. दरम्यान, या बारामती बंदवरून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे. ''बारामती बंद करण्याऐवजी आपल्या करामती बंद करा,'' असा टोला भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे. 



दरम्यान, राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. बुधवारी बारामतीकरांनी कडकडीत बंद पाळत शासनाचा निषेध केला.यावेळी हजारो नागरिकांनी भाजपवि सरकारच्या रोधात जोरदार घोषणाबाजी केली.सरकार हम से डरती है,पोलीस को आगे करती है या घोषणांनी बारामती दुमदुमली.

संतप्त बारामतीकर भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते.यावेळी शहरातील भिगवण चौक येथे झालेल्या गर्दीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांची ,महिलांची संख्या मोठी होती. सकाळपासुनच मोठ्या संख्येने नागरीक ,कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली .यावेळी पोलीस , आरपीएफ जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Baramati Bandh : BJP Leader Avdhoot Wagh Attack on NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.