कोरोनावर आयुष - ६४ औषधाचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:28+5:302021-06-18T04:06:28+5:30

श्री श्री तत्त्वातर्फे वैज्ञानिकदृष्ट्या ग्राह्य आणि वैद्यकीय स्तरावर पारखलेल्या आयुष - ६४ औषधाचे अनावरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

AYUSH on Corona - 64 medicine extract | कोरोनावर आयुष - ६४ औषधाचा उतारा

कोरोनावर आयुष - ६४ औषधाचा उतारा

Next

श्री श्री तत्त्वातर्फे वैज्ञानिकदृष्ट्या ग्राह्य आणि वैद्यकीय स्तरावर पारखलेल्या आयुष - ६४ औषधाचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयुष - ६४ या टॅब्लेट्स सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविड - १९च्या रुग्णांसाठी आयुष मंत्रालयाने प्रमाणित केल्या असून, आयुष मंत्रालयाचे सचिव, पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, श्री श्री तत्त्वाचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद वर्चस्वी यांच्या उपस्थितीत श्री श्री तत्त्वा या संस्थेने नुकतेच ‘आयुष - ६४’ या टॅब्लेट्सचे नुकतेच अनावरण केले. हे औषध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्मित आणि वितरित केले जाईल.

अरविंद वर्चस्वी यावेळी म्हणाले की, श्री श्री तत्त्वा आरोग्य उत्पादने आणि सेवा याबाबत जागतिक स्तरावर गुणवत्तेच्या कसोटीला उतरले आहे. गेल्यावर्षी आम्ही वितरीत केलेले कबासुर कुदिनीर हे औषध आजतागायत जागतिक महामारीत लक्षावधी लोकांना जगभरात आधाराचे ठरले आहे. आता आम्ही आयुष मंत्रालयाच्या सोबतीने वैद्यकीय चाचण्यांतून पारखलेले व मानवतेला मोठ्या प्रमाणावर लाभ देणारे हे औषध आणत आहोत. हे साध्य करण्यासाठी व अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही वन एम जी या कंपनीसोबत भागीदारीत येत आहोत.

आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, हे औषध कोविड - १९च्या उपचारासाठी असून, त्याच्या सात विविध कठोर वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या आहेत. तसेच इतर गणमान्य आरोग्य संस्थांनी याच्या चाचण्या केल्या आहेत.

युजीसीचे माजी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन म्हणाले, या औषधावर आवश्यक त्या चाचण्या करत असतानाच हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर निर्माण करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे वितरण करण्यास उद्योग क्षेत्राचे सहकार्य गरजेचे आहे.

वन एम जीसह संस्थापक विकास चौहान म्हणाले की, शुद्धता का नाम ही टॅग लाईनच दर्शविते की, एखादी योग्य गोष्ट चांगल्या हेतूने ग्राहक, रुग्ण यांना केंद्रीत ठेवून केली तर ती यशस्वी होतेच आणि ग्राहक लाभान्वित व्हावा, याच उद्देशाने आम्ही ही भागीदारी करत आहोत.

गुरुदेव श्री श्री रवीशंकरजी यांच्या प्रेरणेने स्थापित श्री श्री तत्त्वा संस्था जगभर आरोग्य व सर्वांगीण स्वास्थ्य लाभावे, हा उद्देश बाळगते. जगभरात पोहोचलेली ही संस्था आयुर्वेदिक औषधे आणि सेवा, पूरक उत्पादने, अन्न, नित्य वापराच्या वस्तू, सुगंधी उत्पादने तयार करते. आरोग्य क्षेत्राचा गेल्या चाळीस वर्षांचा अनुभव असलेल्या या संस्थेचे आयुर्वेद विज्ञान व संशोधन केंद्र, तेथील प्रेरित डॉक्टर्स, पंचकर्म केंद्र, स्पा आणि क्लिनिक्स, तंत्रज्ञान व आधुनिक नियंत्रण प्रणाली असलेले आयुर्वेद उत्पादन केंद्र असे अनेक विभाग आहेत. त्यांना बहुमूल्य मानांकने प्राप्त आहेत.

* गुणकारी औषध

आयुष - ६४ हे औषध भारतभरातल्या ७ वैद्यकीय परीक्षणांच्या वैज्ञानिक कसोटीवर पारखले आहे. लक्षणे विरहीत, सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या कोविड - १९ आजारावर नियंत्रण करण्यात मानक ठरलेले हे औषध विविध वैद्यकीय तपासण्यात गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. या औषधाचे इन-सिलिको परीक्षणात ३६पैकी ३५ फायटो घटक कोविड - १९ला प्रतिबंध करणारे आढळले आहेत.

* औषध विषाणूंना रोखण्यात ८४ टक्के प्रभावी

श्री श्री तत्त्वाची कबासुर कुदिनीर, अमृत, टर्मेरिक प्लस, शक्ती ड्रॉप्स, तुलसी अर्क आणि च्यवनप्राश ही औषधे यात आहेत. या औषधांची गुणकारिता सिद्ध करण्यास अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. फ्रँकफर्ट इनोव्हेशन सेंटरतर्फे केलेल्या अशाच एका चाचणीत श्री श्री तत्त्वाचे कबासुर कुदिनीर हे औषध विषाणूंना रोखण्यात ८४ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

.....................................

Web Title: AYUSH on Corona - 64 medicine extract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.