मुंबईत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ATSने केली अटक, जैश-ए-मोहम्मद'शी कनेक्शन? तपासात धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:10 IST2026-03-10T14:09:04+5:302026-03-10T14:10:51+5:30
महाराष्ट्र एटीएसने एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक केले असून, त्याचे दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबईत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ATSने केली अटक, जैश-ए-मोहम्मद'शी कनेक्शन? तपासात धक्कादायक माहिती समोर
दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रएटीएसने मुंबईत एक कारवाई केली. या कारवाईने खळबळ उडाली. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आली. एटीएसने केलेल्या तपासात त्याचे बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे आढळून आले. इतकंच नव्हे, तर सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर इस्लामिक पॉलिटिक्स नावाने ग्रुप तयार केला होता. त्यावरून बंदी घालण्यात आलेल्या संघटनांबद्दल पोस्ट टाकल्या जात होत्या.
अयान शेख असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एटीएसने केलेल्या तपासातून त्याचे बंदी घालण्यात दहशतवादी संघटनांशी संबंध असून, ऑनलाईन पद्धतीने तो या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
एटीएसने न्यायालयाला सांगितले की, अयान शेखने टेलिग्रामवर इस्लामिक पॉलिटिक्स नावाने ग्रुप सुरू केला होता. त्यावरून तो बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांचा प्रचार करणाऱ्या पोस्ट शेअर करत होता. तो या पोस्ट काही जणांना टॅग करून वाचायला सांगायचा.
या ग्रुपमध्ये अनेक सदस्य हे परदेशातील आहेत. त्याच्याकडून दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तसेच तो वापरत असलेले ८ ईमेल खाती सध्या यंत्रणांकडून तपासली जात आहेत.
Mumbai ATS arrested engineering student Ayan Shaikh during an investigation into online radical activities linked to banned terrorist organisations. ATS told the court that Shaikh was part of a Telegram group called “Islamic Politics,” where posts promoting banned organisations… pic.twitter.com/9E2EOU3woL
— IANS (@ians_india) March 9, 2026
मागील सहा महिन्यांपासून स्लीपर सेल
एटीएसने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीत म्हटले होते की, संशयित आरोपी अयान शेख हा विद्यार्थी मागील सहा महिन्यांपासून स्लीपर सेल म्हणून दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदसाठी काम करत आहे. त्याच्यावर विद्यार्थ्यांना कट्टरपंथीय विचारधारेकडे आणण्यासाठी, त्यांचा ब्रेनवॉश करण्याचे काम त्याच्यावर सोपवले गेले होते, असाही आरोप करण्यात आला आहे.
अयान हा त्याच्या दोन वर्गमित्रांना आणि इतर जवळच्या मित्रांवर सातत्याने दबाव टाकत होता. दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यासाठी परदेशात जाऊयात, यासाठी त्याने मित्रांचा ब्रेनवॉश केला होता. दोन विद्यार्थांचे जबाबही एटीएसने नोंदवले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.