शिवडी-न्हावाशेवा सेतूसाठी किमान २५० रु. टोल, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 06:56 AM2024-01-05T06:56:00+5:302024-01-05T06:58:01+5:30

अटल सेतू उभारणीकरिता एकूण २१ हजार २०० कोटी रुपये खर्च आला असून, त्यापैकी १५ हजार १०० कोटी रुपये कर्ज घेण्यात आले आहे.

At least Rs. 250 for Sewri-Nhava Sheva sea bridge. Toll, decided in the state cabinet meeting | शिवडी-न्हावाशेवा सेतूसाठी किमान २५० रु. टोल, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

शिवडी-न्हावाशेवा सेतूसाठी किमान २५० रु. टोल, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सेतूवरून प्रवास करण्यासाठी टोल निश्चित करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सर्वसाधारणपणे टोल आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱ्या दरापेक्षा ५० टक्के कमी दराने टोल आकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार कारसाठी ५०० ऐवजी २५० रुपये टोल आकारण्यात येणार आहे.

वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी परतीचा पास एकेरी पथकराच्या दीडपट, दैनिक पास एकेरी पथकराच्या अडीचपट आणि मासिक पास एकेरी पथकराच्या पन्नासपट अशी सवलत देण्यात आली आहे. टोलदराचा एक वर्षानंतर पुन्हा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

२१,२०० कोटी रुपये खर्च 
अटल सेतू उभारणीकरिता एकूण २१ हजार २०० कोटी रुपये खर्च आला असून, त्यापैकी १५ हजार १०० कोटी रुपये कर्ज घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे १५ किलोमीटर इतके अंतर कमी होणार आहे. 
 

Web Title: At least Rs. 250 for Sewri-Nhava Sheva sea bridge. Toll, decided in the state cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.