वीज कंपन्यांना थकबाकीचा शॉक, लाॅकडाऊनचा परिणाम; भांडुप परिमंडळात १७,५४७ लाख रुपये थकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 06:09 AM2021-02-14T06:09:01+5:302021-02-14T06:09:23+5:30

power companies : कोविडमुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणार नाही, असा निर्णय महावितरणने घेतला होता. मात्र, आता थकबाकी वाढत आहे.

Arrears Shock to power companies, impact of lockdown; Rs 17,547 lakh outstanding in Bhandup constituency | वीज कंपन्यांना थकबाकीचा शॉक, लाॅकडाऊनचा परिणाम; भांडुप परिमंडळात १७,५४७ लाख रुपये थकीत

वीज कंपन्यांना थकबाकीचा शॉक, लाॅकडाऊनचा परिणाम; भांडुप परिमंडळात १७,५४७ लाख रुपये थकीत

googlenewsNext

मुंबई : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश देण्यात आले असून, राज्यात कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे, तर मुंबईतल्या भांडुप परिमंडळाचा विचार करता येथे लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती, तसेच सार्वजनिक विभागाकडे वीज बिलाची १७,५४७ लाख रुपयांची थकबाकी आहे.
कोविडमुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करणार नाही, असा निर्णय महावितरणने घेतला होता. मात्र, आता थकबाकी वाढत आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनही थकबाकी भरण्यात न आल्याने शेवटचा पर्याय म्हणून ज्यांनी १ एप्रिल २०२० पासून एकही वीज देयक भरले नाहीत अशांचा वीजपुरवठा १ फेब्रुवारीपासून खंडित करण्यात येत आहे. 
लाॅकडाऊन काळात अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या. त्यामुळे बिल भरणे त्यांच्यासाठी अवघड झाले. त्यातच बिलात सवलत मिळेल या अपेक्षेनेही अनेकांनी बिल भरले नसल्याचे वीज कंपनीतील एका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

एकही वीज देयक भरलेले नाही
महावितरण ही सरकारी यंत्रणा आहे. मात्र, वारंवार विनंती करूनही अनेक ग्राहकांनी लॉकडाऊनपासून आजपर्यंत एकही वीज देयक भरलेले नाही.
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, 
भांडुप परिमंडळ, महावितरण

वीज खरेदीसाठी रोजच द्यावे लागतात पैसे
 ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीकरिता 
पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अवघड
 आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य नाही. बँकांची व इतर देणी, कर्मचाऱ्यांचा 
पगार देणे अवघड झाले आहे.

कंपनी आणि घरगुती ग्राहक संख्या
 - अदानी : २० लाख २७ हजार ६५१
- बेस्ट : ७ लाख ५२ हजार ७९२
- टाटा : ६ लाख ७९ हजार ७४०
-  महावितरण : २ कोटी ८ लाख 
१८ हजार १४८

Web Title: Arrears Shock to power companies, impact of lockdown; Rs 17,547 lakh outstanding in Bhandup constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज