चेंबूरच्या टेंभे पुलाखाली जलवाहिनी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST2021-01-13T04:11:58+5:302021-01-13T04:11:58+5:30

दुकानांमध्ये शिरले पाणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग येथील टेंभे पुलाखाली असणारी जलवाहिनी सोमवारी ...

The aqueduct burst under the Tembhe bridge at Chembur | चेंबूरच्या टेंभे पुलाखाली जलवाहिनी फुटली

चेंबूरच्या टेंभे पुलाखाली जलवाहिनी फुटली

दुकानांमध्ये शिरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग येथील टेंभे पुलाखाली असणारी जलवाहिनी सोमवारी पहाटे अचानक फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले तसेच संपूर्ण परिसर जलमय झाला होता. या घटनेमुळे लोखंडे मार्ग परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले होते.

जलवाहिनी फुटल्यामुळे चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्ग व पी. वाय. थोरात मार्ग या परिसरांमधील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. जलवाहिनी दुरुस्त झाल्याशिवाय या परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत होणार नसल्याने नागरिक चिंतेत आहेत. ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. चेंबूर परिसरात विविध विकासकामे सुरू असल्याने वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा नागरिकांचा आराेप आहे.

........................

Web Title: The aqueduct burst under the Tembhe bridge at Chembur