..तर अफजल खानाच्या कबरी प्रकरणी शासनाचे नव्याने आदेश !

By Admin | Updated: October 2, 2014 01:07 IST2014-10-02T01:07:17+5:302014-10-02T01:07:17+5:30

अफजल खानाच्या कबरीमध्ये पर्यटक व नागरिकांना प्रवेशबंदी करण्याबाबत राज्य शासन येत्या दोन महिन्यांत नव्याने आदेश जारी करू शकते, असे बुधवारी उच्च न्यायालयाने स्पष्ट केल़े

..and new order in the case of Afzal Khan's grave case! | ..तर अफजल खानाच्या कबरी प्रकरणी शासनाचे नव्याने आदेश !

..तर अफजल खानाच्या कबरी प्रकरणी शासनाचे नव्याने आदेश !

मुंबई : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीमध्ये पर्यटक व नागरिकांना प्रवेशबंदी करण्याबाबत राज्य शासन येत्या दोन महिन्यांत नव्याने आदेश जारी करू शकते, असे बुधवारी उच्च न्यायालयाने स्पष्ट केल़े
न्या़ अभय ओक व न्या़ गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिल़े तसेच शासनाने याआधी या कबरीजवळ केलेली प्रवेशबंदीही न्यायालयाने रद्द केली़ मात्र ही बंदी रद्द करण्याच्या स्वत:च्याच आदेशाला न्यायालयाने आठ आठवडय़ांची स्थगिती दिली असून, या कालावधीत शासन नव्याने याबाबत निर्णय घेऊ शकत़े या प्रकरणी फरीद डावरे यांनी याचिका केली आह़े त्यानुसार, 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला़ त्यानंतर तेथे खानाची कबर बांधण्यात आली़ 
मात्र ही कबर पाडण्याची मागणी काही हिंदू संघटनांनी केली़ 
त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला आणि कायदा व सुव्यवस्थेचे 
कारण देत शासनाने 2क्क्3 पासून 
या कबरीच्या परिसरात 
पर्यटक व नागरिकांना बंदी केली़ हे गैर असून ही कबर म्हणजे एक इतिहास आह़े अशा प्रकारे बंदी घातल्यास नवीन पिढीला हा इतिहास कळणार नाही़
त्यामुळे ही बंदी उठवावी़ तसेच या कबरीजवळ असलेल्या बांधकामाचे रूपांतर म्युङिायममध्ये करावे व या कबरीच्या संरक्षणासाठी तेथे कॅमेरे लावावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े
 

 

Web Title: ..and new order in the case of Afzal Khan's grave case!