Amruta Fadnavis congratulates Ajit Pawar and devendra fadanvis for CM and dy. CM of maharashtra | अमृता फडणवीसांकडून अजित पवारांचे अभिनंदन, तर देवेंद्रांना म्हणाल्या...
अमृता फडणवीसांकडून अजित पवारांचे अभिनंदन, तर देवेंद्रांना म्हणाल्या...

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाने अजित पवारांशी हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांना शपथ देण्यात आली आहे. एका रात्रीत घडलेल्या या घडामोडीमुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... असे म्हणत फडणवीस यांनी आपला शब्द खरा खरुन दाखवला. 

देवेद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी मी पुन्हा येईन... असे विधान केल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र येत महाविकासआघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं ठरवलं होतं. तसेच, फडणवीसांना आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचं गणित आखलं होतं. पण, अजित पवारांच्या फुटीरतावादी खेळीनं पवारांच गणित बिघडलंय. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर, राज्य आणि देशपातळीतून फडणवीसांचं अभिनंदन केलं जात आहे. तसेच, फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. 

फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांनीही ट्विटरवरुन देवेंद्र यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, देवेंद्र यांचं अभिनंदन करताना, तुम्ही करुन दाखवलं.. You Have Done it असं ट्विट अमृता यांनी लिहिलंय. तसेच, अजित पवारांचंही मिसेस मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय.   

Web Title: Amruta Fadnavis congratulates Ajit Pawar and devendra fadanvis for CM and dy. CM of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.