Join us

राज्यात ३० जूनपर्यंत 'हे' सर्व बंदच राहणार, राज्य सरकारचा काळजीवाहू निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 18:02 IST

केंद्र सरकारनेही कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहे.

मुंबई - केंद्र सरकारपाठोपाठ महाराष्ट्र सरकारनंही आपली नियमावली प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारप्रमाणेच राज्यानेही ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असून ५ जूनपासून मार्केट कॉम्प्लेक्स, सर्व बाजारपेठ आणि दुकानांना सम-विषम तत्त्वावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्याने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांत नियम शिथिल केले जाणार आहेत. मात्र, या कालावधीत संपूर्ण राज्यात काही स्थळं व व्यवसायास बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारनेही कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये सूट दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंटेन्मेंट झोनमध्ये सर्व बंद असेल, मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहेत. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे. राज्य सरकारने केंद्राच्या काही नियमांना अनुसरुन तर काही राज्य सरकारचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे, राज्यात  धार्मिक आणि उपासना स्थळे, सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. त्यासोबतच, हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत. राज्यात सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मैदानेही खुली केली जाणार आहे. समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही मान्यता दिलेली आहे. ८ जूनपासून सर्व खासगी कार्यालये आवश्यकतेनुसार १०% पर्यंत कर्मचाऱ्यांसह सुरू करता येतील आणि उर्वरित व्यक्ती घरून काम करू शकतील. 

राज्यात हे बंदच राहणार

शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, ट्रेनिंग आणि कोचिंग क्लासेस आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक ( महाराष्ट्र सरकारची परवानगी असल्यास मुभा)मेट्रो रेल्वेरेल्वेचा राज्यांतर्गत प्रवास आणि राज्यांतर्गत हवाई वाहतूक ( सरकारने परवानगी दिली असल्यास मुभा )सिनेमा हॉल, जीम, स्वीमींग पूल, मनोरंजन गार्डन, थेअटर, बार आणि संग्रहालय, विधानभवन व तत्सम ठिकाणंसामाजिक, राजकीय, क्रीडात्मक, मनोरंजनात्मक, सांस्कृतिक, धार्मिक कार्य आणि मोठे सोहळेधार्मिक प्रार्थना स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळंबार्बर शॉप, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लरशॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवेची ठिकाणं

 

दरम्यान, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशी काम करणाऱ्या तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून काम करावे लागणार आहेत. गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती न्यावे लागणार आहे. जेणेकरून तिथे जास्त गर्दी होणार नाही. सामूहिक (ग्रुप) हालचालींना परवानगी नाही. लहान मुलांसोबत पालकांना थांबणे आवश्यक करण्यात आले आहे. केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास मोकळ्या मैदानात जाण्याची मुभाही देण्यात आली आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन बंधनकारक असणार आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसहॉटेलशाळा