Join us  

'शिवतारेंची अजित पवारांवर जहरी टीका', राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडणार? 'या' नेत्याने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 10:42 AM

Ajit Pawar Vijay Shivtare :  बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा सुरू आहे. या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याचे दिसत आहे.

Ajit Pawar Vijay Shivtare (Marathi News) :  बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा सुरू आहे. या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आता महायुतीमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनीही उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे. शिवतारे यांनी काल उमेदवारी जाहीर केली, यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना 'विंच'वाची उपमा दिली. यावरुन आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी काल महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. 

कोण आहेत के सुरेंद्रन? भाजपनं वायनाडमधून उतरवलं मैदानात, राहुल गांधींचं टेन्शन वाढवणार!

राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी विजय शिवतारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काल माध्यमांसोबत बोलताना उमेश पाटील म्हणाले, एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन चप्पलेने मारण्याची भाषा विंचू शब्दाचा प्रयोग एवढं ऐकून घेण्याएवढं आम्ही लाचार झालेलो नाही. विजय शिवतारे हे शिवसेनेचे ज्येष्ठनेते आहेत.  माजी मंत्री आहेत, महायुतीतील घटक पक्षाचे ते नेते आहेत. त्याची हकालपट्टी करा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच केली आहे, असा टोला उमेश पाटील यांनी लगावला आहे. 

"महायुतीमधील एका खासदाराला ते अडचण निर्माण करण्याचे काम करत असेल आणि आमच्या नेत्यावर जर या स्तरावर जाऊन काम करत असतील तर निश्चितपणे महायुतीमध्ये आम्ही रहायचे की नाही याचा विचार आम्हाला करावा लागेल, असा इशाराही उमेश पाटील यांनी दिला आहे. 

'आम्ही अडवू शकत नाही'

विजय शिवतारे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर संजय शिरसाट म्हणाले की, कोणत्याही उमेदवाराला निवडणूक लढविण्यापासून थांबवू शकत नाही. आम्ही अडवू शकत नाही. जर एखादा उमेदवार पक्षाच्या चौकटीत काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावे लागतील. एखाद्याने पक्ष सोडला असेल तर तो स्वतंत्र आहे. परंतु, पक्षात असाल तर महायुतीचा धर्म पाळावाच लागेल. ज्यांना हा धर्म पाळायचा नसेल त्यांनी त्यांचे मार्ग वेगळे निवडावे. त्यांना आमचा पाठिंबा नसेल. विजय शिवतारे यांना बारामतीमधून लढायचे असेल तर त्याच्याशी आमचा संबंध नाही, असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाएकनाथ शिंदे