६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उघडला ‘भारतमाता’चा पडदा; मोठा गाजावाजा न करता सिनेमागृह सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 05:42 IST2026-03-25T05:40:10+5:302026-03-25T05:42:35+5:30

मराठी चित्रपटांचे प्रदर्शन हे भारतमाता सिनेमागृहाचे खास वैशिष्ट्य आहे.

after a 6 year wait the curtain of bharat mata cinema hall opened without much fanfare | ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उघडला ‘भारतमाता’चा पडदा; मोठा गाजावाजा न करता सिनेमागृह सेवेत

६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उघडला ‘भारतमाता’चा पडदा; मोठा गाजावाजा न करता सिनेमागृह सेवेत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी लालबागमधील आयकॉनिक भारतमाता सिनेमागृहाचा पडदा उघडला आहे. मोठा गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने संध्याकाळी ५:३० वाजता हिंदी सिनेमाचा शो दाखविण्यात आला. 

मराठी चित्रपटांचे प्रदर्शन हे भारतमाता सिनेमागृहाचे खास वैशिष्ट्य आहे. विशेषत: दादा कोंडके यांच्या चित्रपटांनी इथे नेहमीच गर्दी खेचली आहे. त्यामुळे लवकरच मराठी चित्रपटही दाखवले जाणार आहेत. 

हे सिनेमागृह वन सिनेमाच्या व्यवस्थापनाखाली सुरू राहणार आहे. मुख्य प्रवेशद्वारावर ‘वन सिनेमाज’ असे नाव असून, त्याच्या बाजूला भारतमाता सिनेमागृह हा मूळ नावाचा फलक लावला आहे. सिनेमागृह सुरू झाल्यानंतरही प्रवेशद्वारावरच्या नावावरील लाल रंगाचा पडदा काढण्यात आला नसून, तो लवकरच काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले. नूतनीकरणनंतर सिनेमाचा पडदा मोठा करण्यात आला असून, प्रोजेक्टरसाठी नवीन रूम बनविण्यात आली आहे. बाल्कनीमध्ये ४० आरामदायी सोफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बाल्कनीबाहेरील गॅलरीत जुन्या भारतमाताचा लूक तसाच ठेवून नवीन साज चढविण्यात आला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटगृहांच्या प्रीमियर शोसाठी जणू त्यांचे हक्काचे माहेरघर पुन्हा सुरू झाले आहे.

सिनेमागृहाचे व्यवस्थापकीय भागीदार कपिल भोपटकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, लवकरच मराठी सिनेमेही दाखवले जातील. या सिनेमागृहाचे महत्त्व केवळ आम्हालाच नव्हे, तर मराठी सिनेसृष्टीलाही माहित आहे.

अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीचा आजवरचा सिनेमागृहाचा प्रवास खूप खडतर होता. २०२०मध्ये जेव्हा दोन-तीन महिन्यांसाठी सिनेमागृह बंद केले होते, तेव्हा पुन्हा सुरू करण्यासाठी इतका काळ लागेल असे वाटले नव्हते. त्यानंतर कोवीड आल्याने बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि सिनेमागृह सुरू होण्यास उशीर झाला. उशिरा का होईना सिनेमागृह पुन्हा सुरू झाल्याचा आनंद आहे.

 

Web Title : छह साल बाद खुला भारतमाता सिनेमा, सादगी से फिर शुरू

Web Summary : मुंबई का प्रतिष्ठित भारतमाता सिनेमा छह साल बाद हिंदी फिल्म के साथ फिर खुला। मराठी फिल्में जल्द ही दिखाई जाएंगी। नवीनीकरण में बड़ा पर्दा और आरामदायक बालकनी शामिल है, जो पुराने लुक को बरकरार रखती है। प्रबंधन ने मराठी सिनेमा के लिए सिनेमाघर के महत्व को स्वीकार करते हुए खुशी व्यक्त की।

Web Title : BharatMata Cinema Reopens After Six Years, Quietly Resumes Service

Web Summary : After six years, Mumbai's iconic BharatMata cinema reopened with a Hindi film screening. Marathi films, a staple, will soon follow. Renovations include a larger screen and comfortable balcony seating, preserving its classic look. The management expresses joy at the reopening, acknowledging the cinema's significance to Marathi cinema.