Lokmat Digital Creator Awards 2023: 'गद्दार आमदारांचे आज ना उद्या निलंबन होणार' ; आदित्य ठाकरेंनी तोफ डागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 20:54 IST2023-02-22T19:53:35+5:302023-02-22T20:54:47+5:30

Lokmat Digital Creator Awards : 'माझ्या वडिलांची सर्जरी झाली होती, तेव्हापासून यांच्या मनात काहीतरी सुरू होतं.'

Aditya Thackeray in Lokmat Digital Creator Awards: 'Traitor MLAs will be suspended today or tomorrow'; Says Aditya Thackeray | Lokmat Digital Creator Awards 2023: 'गद्दार आमदारांचे आज ना उद्या निलंबन होणार' ; आदित्य ठाकरेंनी तोफ डागली

Lokmat Digital Creator Awards 2023: 'गद्दार आमदारांचे आज ना उद्या निलंबन होणार' ; आदित्य ठाकरेंनी तोफ डागली

Lokmat Digital Creator Awards 2023: मुंबईत लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड 2023 सोहळा पार पडला. या सोहळ्यात डिजिटल इन्फ्ल्युन्सर्सचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा आणि मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला असंवैधानिक सरकार म्हटले. तसेच, सुप्रीम कोर्टात गद्दार आमदारांचे निलंबन होणार असल्याचा दावाही केला. शिंदे गट काहीतरी गडबड करणार, अशी माहिती अजित पवारांनी आधीच दिली होती का, यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'माझ्या वडिलांची सर्जरी झाली होती, तेव्हापासून यांच्या मनात मुख्यमंत्री बनण्याची किंवा सरकारमधून बाहेर पडण्याची खटपट सुरू होती. 20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी विचारलं होतं की, तुमच्या मनात काय आहे? पण, तेव्हा त्यांनी काही सांगितलं नाही. ज्यांनी स्वतःला विकलंय, त्यांना थांबवून काय फायदा.' 

2000 कोटींची देवाण-घेवाण झाली? आदित्य ठाकरे म्हणतात- संजय राऊतांचा दावा खरा असू शकतो

शिवसेनेचे आमदार म्हणायचे की, अजित पवार फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांनाच फंड देतात? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणतात, 'अजित पवारांनी सेशनमध्येच फंड दिल्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला होता. आमदारांना आमच्या काळात खूप फंड दिला. आता त्यांना विचारा, आता फंड नाही, आवाजही दाबला जातोय. हे सगळे आज ना उद्या निलंबित होणार. मी त्यांना आव्हान देतोय, राजीनामा द्या आणि निवडणूक लढा, जनता निर्णय घेईल. मी मुख्यमंत्र्यांनाही आव्हान दिलंय, वरळीतून लढा किंवा मी तुमच्या ठाण्यातून लढतो. पण, निवडणूक घेण्याची यांच्यात हिम्मत नाही,' अशी टीकाही आदित्य यांनी केली. 

Web Title: Aditya Thackeray in Lokmat Digital Creator Awards: 'Traitor MLAs will be suspended today or tomorrow'; Says Aditya Thackeray