Join us  

"महाराष्ट्र सरकारचं क-क-क कंगनाच सुरु, माझा नाद सोडला तर..."; कंगनाने पुन्हा डिवचले

By मुकेश चव्हाण | Published: September 21, 2020 3:04 PM

पुन्हा कंगना राणौतनं राज्यातील सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उघडपणे बोलणारी अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. मुंबईची तुलना POK (पाकव्यप्त काश्मीरशी) करून कंगना राणौतने एक वाद ओढवून घेतला. या वादाचे देशभर पडसाद उमटले. कंगना राणौत विरूद्ध शिवसेना वादाचे नाट्यही रंगले होते. मात्र आता पुन्हा कंगना राणौतनं राज्यातील सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे.

मास्क न घातल्याचा राज ठाकरेंना फटका; अधिकाऱ्यांनी काय केलं बघा!

एका ट्विटमधून भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत माहिती देत, 'सध्या दुर्दैव हे आहे की सध्या महाराष्ट्र शासनाकडे फक्त कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्यापुरताच वेळ आहे', अशी प्रतिक्रिया देण्यात आली. या ट्विटचा संदर्भ घेत कंगना ट्विट करत म्हणाली की, महाराष्ट्र सरकारचं क-क-क-क कंगनाच सुरु आहे. त्यांनी माझा नाद सोडला तर कुठं, साऱ्या राज्याचा डोलारा नेमका कसा कोलमडत आहे हे त्यांच्या लक्षात येईल', असं कंगनाने म्हटले आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार कंगनाला का प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कंगनाने मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचे म्हणत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यावर शिवसेनेने तिच्यावर टीकास्त्र सोडले. त्यातून वाद पेटला. शिवसेनेने हा विषय आमच्यासाठी संपला असे म्हटले असले तरी कंगना मागे हटायला तयार नाही. 

कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला- संजय राऊत

कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला. आम्ही याबाबत चर्चा करणे सोडून दिले आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी कंगनाबाबत कोणतेच भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. शिवसेनेने कंगनासोबत संघर्षाचा पवित्रा घेतल्याने विनाकारण वादंग निर्माण होत असल्याची भावना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व्यक्त झाली.

"आता शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली, भाजपाची ही झाशीची राणी इतकी शेफारली"

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सूचकपणे सबुरीचा सल्ला दिला. या साऱ्या घडामोडीनंतर शिवसेनेने या प्रकरणी आता कोणतेच विधान करायचे नाही, अथवा जाहीर भूमिका घ्यायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. कंगनाने मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली असतानाही संजय राऊत यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता. 

कंगनाला नुकसानभरपाई मिळायला हवी - आठवले

कंगना रनौतच्या कार्यालयावर महापालिकेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. नियमांचे उल्लंघन करून ती करण्यात आल्याने कंगनाला नुकसानभरपाई मिळायला हवी, अशी मागणी आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. आठवले यांनी शुक्रवारी सकाळी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. यावेळी कंगनाला नुकसान भरपाई मिळावी, कोरोना आणि कोझिकोड विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले कॅप्टन दीपक साठे यांच्याबाबत त्यांनी चर्चा केली.

अन्य महत्वाच्या बातम्या-

"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच"

Video: मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी; मनसैनिकांचा 'लोकल'ने प्रवास

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार

टॅग्स :उद्धव ठाकरेकंगना राणौतमहाराष्ट्र सरकारबॉलिवूड