दुर्घटना! कुर्ल्यात तीन मजली इमारतीचा भाग कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 15:33 IST2020-06-18T15:32:00+5:302020-06-18T15:33:17+5:30
जानेवारी महिन्यात या इमारतीत मोठी आग लागली होती. यानंतर महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक असल्याचे सांगितले होते.

दुर्घटना! कुर्ल्यात तीन मजली इमारतीचा भाग कोसळला
मुंबई : कुर्ला पश्चिम येथील सीएसटी मार्गावरील मेहता इमारतीचा काही भाग कोसळला. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने इमारतीचा जो भाग कोसळला त्या भागात कोणीच राहत नसल्याने जीवितहानी टळली. जानेवारी महिन्यात या इमारतीत मोठी आग लागली होती. यानंतर महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक असल्याचे सांगितले होते.
मुंबई - कुर्ला पश्चिम येथील नेता इमारतीचा कोपऱ्याकडील भाग कोसळला, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) June 18, 2020
गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास आजुबाजूच्या नागरिकांना काहीतरी कोसळल्याचा मोठा आवाज आला. यानंतर इमारतीचा काही भाग असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले व त्यांनी अग्निशामक दलास पाचारण केले. यावेळी अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोहोचले परंतु इमारतीत कोणीच राहत नसल्याने हानी टळली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक