मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 12:21 IST2018-04-30T09:23:06+5:302018-04-30T12:21:05+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात घडला आहे.

Accident on Mumbai-Pune expressway, death toll 3 | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू 

मुंबई - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात घडला आहे. टेम्पोनं दिलेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई लेनवर 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली आहे. सोमवारी (30 एप्रिल) पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

बंद पडलेल्या ओम्नी कारला धक्का मारत असताना मागील बाजूनं भरधाव येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.  जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. 

 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृतांची नावं 
1) संतोष प्रजापती (वय 40 वर्ष)
2) रशीद नफिज खान (वय 24 वर्ष)
3) जुमन शौरतअली शेख (वय 45 वर्ष) 
4) दिनेश जैस्वाल 
5) अयोध्या यादव (वय 26 वर्ष) 
मृत पावलेले सर्व जण मुंबईतील मानखुर्द येथील रहिवासी होते.

जखमींची नाव

संजय राजभर ( वय 28 वर्ष) 
मुंद्रिका प्रसाद जैस्वाल ( वय 36 वर्ष)
जखमी मानखुर्दच्या इंदिरानगरमधील रहिवासी आहेत.  

Web Title: Accident on Mumbai-Pune expressway, death toll 3