अबब...चार दिवसांत रिलायन्सचे 70 हजार कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 05:26 PM2019-05-09T17:26:26+5:302019-05-09T17:26:52+5:30

शेअर बाजार आज तीन महिन्यांच्या खालच्या स्तरावर जाऊन बंद झाला.

Above ... Reliance's 70,000 crores of rupees were stolen in four days | अबब...चार दिवसांत रिलायन्सचे 70 हजार कोटी बुडाले

अबब...चार दिवसांत रिलायन्सचे 70 हजार कोटी बुडाले

Next

शेअर बाजार आज तीन महिन्यांच्या खालच्या स्तरावर जाऊन बंद झाला. जागतिक बाजार कोसळत असल्याने याचा परिणाम सेंन्सेक्स आणि निफ्टीवरही झाला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर 25 टक्क्यांनी कर वाढविला आहे. यामुळे गेल्या 4 दिवसांपासून शेअर बाजार कोसळत असून यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे तब्बल 70 हजार कोटी रुपये बुडाले आहेत. 


सेन्सेक्स 230.22 अंकांनी कोसळून 37,558.91 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 57 अंकांनी कोसळून 11301.80 वर बंद झाला. यावेळी सर्वाधिक घसरण बँकिंग आणि इन्फ्राशी संबंधीत शेअरवर झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये 3.5 टक्क्यांची घसरण झाली. 

टीसीएस बनली सर्वात मोठी कंपनी
रिलायन्सला गेल्या चार दिवसांपासून 70 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे बाजारी मुल्यामध्ये रिलायन्स टीसीएसपेक्षा खाली आली. गुरुवारी रिलायन्सचा शेअर 3.50 टक्क्यांनी कोसळून 1254 रुपयांवर स्थिर होता. यामुळे कंपनीचे मुल्य घसरुण 7.95 लाख कोटी झाले होते. तर टीसीएस 8.14 लाख कोटींमुळे देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 


 

सोने, चांदी वाढले
याउलट सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने 77 रुपयांनी वाढून 31762 रुपयांवर बंद झाले. तर चांदी 92 रुपयांनी वाढून 37494 रुपयांवर बंद झाले. 
 

Web Title: Above ... Reliance's 70,000 crores of rupees were stolen in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.