मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:42 IST2025-07-04T12:37:26+5:302025-07-04T12:42:55+5:30
Mumbai Rape Case Today: ऑफिसमधील सहकाऱ्यांची ट्रिप अलिबागला गेली होती. ट्रिपमध्ये पार्टी झाली, त्यानंतर रात्री सहकाऱ्याने तरुणी एकटीच झोपली असल्याचे पाहून खोलीत प्रवेश केला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
मुंबईत एका खासगी कंपनी काम करणाऱ्या सहकारी अलिबागला गेले. तिथे त्यांनी पार्टी केली. पार्टीमध्ये तरुणीनेही दारू प्यायली. दारूच्या नशेत ती खोलीत झोपलेली असताना एका सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी अभिषेक सावडेकर (वय २५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने तक्रार दिल्यानंतर अलिबागपोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील एका कंपनीमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी असे १४ जण ऑफिसच्या पार्टीसाठी मांडवा येथे गेले होते. ३० जून रोजी ते अलिबाग तालुक्यातील मुशेतमधील एका व्हिलामध्ये पोहोचले.
काम आटोपून पार्टीमध्ये आली
व्हिलामध्ये पार्टी सुरू झाली. त्यावेळी तरुणीच्या बॉसने तिला पगाराच्या बिलाचे काम पूर्ण करण्यास सांगितले. काम पूर्ण झाल्यानंतर ती रात्री ८.३० वाजता पार्टीमध्ये सहभागी झाली. इतर सहकाऱ्यासोबत तरुणीनेही मद्यपान केले.
दारू जास्त झाली अन्...
तरुणीला दारूची नशा जास्त चढली. त्यानंतर ती व्हिलामध्ये असलेल्या जलतरण तलावाजवळच झोपली. काही सहकाऱ्यांनी तिला बघितलं. त्यांनी तिला बेडरुममध्ये नेले.
१ जुलैच्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पीडित तरुणीला कुणीतरी आपल्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवत असल्याचे जाणवले. तिने डोळे उघडून बघितले असता अभिषेक सावडेकर हा रुममधून बाहेर जाताना दिसला.
अभिषेक नशेत असल्याचे बघून बळजबरी शरीरसंबंध ठेवले असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. ती रुममधून बाहेर आली. त्यावेळी रुमबाहेर आयुष ठक्कर आणि जसपाल सिंह हे उभे होते.
वाचा >>आत्याच्या नवऱ्यासोबतच प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
तिने त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी आम्ही आताच आल्याचे सांगितले आणि काय झालं असं विचारलं. त्यानंतर तरुणी अभिषेकच्या रुमकडे गेली. पण, तो दरवाजा बंद करून झोपला होता. सकाळी ११ वाजता तो उठला तेव्हा ती परत त्याच्याकडे गेली.
तरुणीची मागितली माफी
पीडित तरुणी अभिषेककडे गेली आणि तिने त्याला झालेल्या प्रकाराबद्दल विचारले. त्यानंतर तो घाबरला आणि तरुणीची माफी मागू लागला. त्याने अत्याचार केल्याचे कळल्यानंतर तरुणी तिथून निघाली. त्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात तिने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.