मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:05 IST2025-09-11T13:03:10+5:302025-09-11T13:05:28+5:30
घरातील दागिने चोरीला गेले. महिलेने पतीवर आरोप केला. याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर महिलेचं तिच्या मुलीच्याच बॉयफ्रेंडसोबत सुरू असलेलं प्रेमप्रकरण समोर आलं.

मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
मुंबई : १८ वर्षीय मुलीच्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी ४० वर्षीय महिलेने घरातील सोन्याचे दागिने चोरले. ही घटना दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. विशेष म्हणजे या महिलेने पतीनेच दागिने चोरल्याचा आरोप केला होता. तिला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी १०.५ तोळ्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
महिलेने कपाटातील दागिने गायब झाल्याचे सांगत पतीवरच चोरीचा आरोप केला. या प्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात दागिने चोरीला गेल्या प्रकरणी तक्रार करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अजित देसाई यांनी तपास सुरू केला.
घरफोडीचे कोणतेही पुरावे त्यांना न सापडल्याने पोलिसांनी घरातील व्यक्तींवरच संशय घेतला आणि सर्वांचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले असता महिलेचे प्रेमप्रकरण उजेडात आले.
महिलेने घरातील दागिने चोरून विकले होते. त्या पैशांमधून जवळपास १० लाख तिने प्रियकराच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
मुलीच्याच प्रियकराच्या पडली प्रेमात
महिला चोरीनंतरही मुलीच्या प्रियकरासोबत सातत्याने फोनवर संपर्क होत असल्याचे कॉल रेकॉर्डमुळे स्पष्ट झाले. महिलेने काही दागिने त्याच्याकडे दिले होते.
पोलिसांनी जेव्हा त्या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्याने आधी माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर त्याने महिलेने रचलेला संपूर्ण कट पोलिसांना सांगितला. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.