आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा! ‘फोन टॅपिंग’ प्रकरण कायमचं बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 12:02 PM2023-08-23T12:02:19+5:302023-08-23T12:04:39+5:30

सीबीआयने कोर्टाला क्लोजर रिपोर्ट दिला आहे.

A big relief to IPS officer Rashmi Shukla! The case of 'phone tapping' is closed forever | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा! ‘फोन टॅपिंग’ प्रकरण कायमचं बंद

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा! ‘फोन टॅपिंग’ प्रकरण कायमचं बंद

googlenewsNext

आघाडी सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरण आता कायमचे बंद झाले आहे. या संदर्भात सीबीआयने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्विकारले आहे, त्यामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या वाटाघाटी सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही जबाब नोंदवला होता. 

2024 मध्ये कोण असणार टीम INDIA कडून PM पदाचा उमेदवार, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

२०१९ च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्या संदर्भात वाटाघाटी सुरू होत्या. यावेळी महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौकशी झाली. सीबीआयने या संदर्भात आता क्लोजर अहवाल दिला आहे. यात हे आरोप निष्पन्न होत नाहीत, असं म्हटले आहे. 

सीबीआयने एक क्लोजर रिपोर्ट केलेल्या फाईलला कोर्टाने आता मान्यता दिली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कायमचे बंद झाले आहे. मार्च २०२१ मध्ये विरोधी पक्षनेते पदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी टॅपिंग संदर्भात आरोप केले होते. तसेच सरकारचा डेटा विरोधी पक्षांकडे कसा गेला हा आरोप केला होता. यावर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी केली होती. महाविका आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले, आता या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला आहे. आता हे प्रकरण कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. 

नेत्यांचे फोन टॅप करण्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर  शिवसेनेने भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. या काळात  रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी असताना मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, आमदार आशिष देशमुख, एकनाथ खडसे यांचा समावेश होता.

Web Title: A big relief to IPS officer Rashmi Shukla! The case of 'phone tapping' is closed forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.