धक्कादायक! ३० वर्षीय महिलेची प्रियकराने ऑटोरिक्षात केली हत्या, मुंबईतील घटनेनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 06:50 PM2023-06-19T18:50:43+5:302023-06-19T18:51:06+5:30

मुंबईच्या साकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

A 30 year-old woman was allegedly murdered by her boyfriend inside an autorickshaw in Mumbai's Sakinaka, Mumbai Police has informed and NCP leader Supriya Sule has criticized the government | धक्कादायक! ३० वर्षीय महिलेची प्रियकराने ऑटोरिक्षात केली हत्या, मुंबईतील घटनेनं खळबळ

धक्कादायक! ३० वर्षीय महिलेची प्रियकराने ऑटोरिक्षात केली हत्या, मुंबईतील घटनेनं खळबळ

googlenewsNext

मुंबई : मुंबईच्यासाकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका ३० वर्षीय महिलेची तिच्या प्रियकराने ऑटोरिक्षात हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे जोडपे रिक्षातून प्रवास करत होते. मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर ही घटना घडली. महिलेशी वाद झाल्यानंतर आरोपीने महिलेचा गळा चिरून ऑटोमध्ये बसून तिथून पळ काढला. पण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. 

मुंबईतील या धक्कादायक घटनेनंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. अलीकडेच मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एका तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. 

साकीनाका येतील घटनेचा दाखला देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. "साकीनाका, मुंबई येथे एका महिलेचा भररस्त्यात गळा चिरून खून करुन आरोपी पसार झाला. ही अतिशय संतापजनक घटना आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरिक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणा सक्रिय करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याची जरब बसणे गरजेचे आहे", असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले. 

Web Title: A 30 year-old woman was allegedly murdered by her boyfriend inside an autorickshaw in Mumbai's Sakinaka, Mumbai Police has informed and NCP leader Supriya Sule has criticized the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.