मद्यासाठी गमवावे लागले ९९ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:05 IST2021-01-14T04:05:57+5:302021-01-14T04:05:57+5:30

मुंबई : मद्याच्या घरपोच सेवेसाठी सांताक्रुझ येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय तरुणाला ९८ हजार ८८३ रुपये गमवावे लागले. त्याच्या ...

99,000 had to be lost for alcohol | मद्यासाठी गमवावे लागले ९९ हजार

मद्यासाठी गमवावे लागले ९९ हजार

मुंबई : मद्याच्या घरपोच सेवेसाठी सांताक्रुझ येथील रहिवासी असलेल्या २१ वर्षीय तरुणाला ९८ हजार ८८३ रुपये गमवावे लागले. त्याच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी अनोळखी ठगाविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सुरू आहे.

..................................................

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : मैत्रिणीनेच आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत, अल्पवयीन मुलीला दोन तरुणांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी चाैघांवर कारवाई केली असून, यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

..............................................

डेटिंग ॲपची ओळख पडली महागात

मुंबई : डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या तरुणीसोबत विवस्रावस्थेत चॅटिंग करणे एका व्यावसायिकाला महागात पडले. तरुणीने त्याचे रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देत, खंडणी मागितली. व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार, मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

.........................................

Web Title: 99,000 had to be lost for alcohol