एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा; संपाचा फटका, ११९ आगार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 07:21 AM2021-11-08T07:21:24+5:302021-11-08T07:24:49+5:30

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून असतात.

55 crore loss to ST Corporation; Strike strikes, 119 depots closed | एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा; संपाचा फटका, ११९ आगार बंद

एसटी महामंडळाला ५५ कोटींचा तोटा; संपाचा फटका, ११९ आगार बंद

Next

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. रविवारी ११९ आगार बंद असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आतापर्यंत एसटी महामंडळाचे ५५ कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून असतात. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे राज्यभरातील २५० आगारांपैकी ११९ हून अधिक आगारांतील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे दिवाळीसाठी गावी गेलेल्या प्रवाशांना या संपाचा मोठा फटका बसला आहे.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, संपापूर्वी राज्यातील एसटी प्रवाशांची संख्या २७ लाख होती. यामध्ये घट होऊन ती २० लाखांहून कमी झाली आहे. विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने दोन दिवस उपोषण करण्यात आले होते. मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आला होता. मात्र न्यायालयाने मनाई केल्यानंतरही विलीनीकरणच्या मुद्द्यावरून अद्यापही ११९ आगारांमध्ये संप सुरूच आहे.

आज होणार सुनावणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत ८ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सकाळी १० वाजता सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सरकारकडून समिती स्थापन करण्याबाबत राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.

Web Title: 55 crore loss to ST Corporation; Strike strikes, 119 depots closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.