मुंबई-ठाण्यात ५० मिमी कोसळलेल्या मुसळधारेचा राज्याला इशारा कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 15:00 IST2020-09-13T15:00:25+5:302020-09-13T15:00:48+5:30
राज्यभरात आता आठवडाभर मान्सून सक्रीय राहील

मुंबई-ठाण्यात ५० मिमी कोसळलेल्या मुसळधारेचा राज्याला इशारा कायम
मुंबई : राज्यभरात आता आठवडाभर मान्सून सक्रीय राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असतानाच मुंबईसह लगतच्या प्रदेशात पाऊसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईसह ठाण्यात तुरळक ठिकाणी कोसळलेल्या पावसाची ५० मिलीमीटरहून अधिक नोंद झाली आहे. पावसाचा मारा असाच मुंबईत सोमवारीदेखील सुरु राहणार असून, राज्यात सर्वत्र मान्सून सक्रीय राहणार आहे.
मुंबईत कुलाबा येथे १६.४ आणि सांताक्रूझ येथे २५.७ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत १०२.०४ टक्के एवढा पाऊस कोसळला आहे. कोसळणा-या पावसात पडझड सुरुच असून, ७ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. २ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले असून, रविवारी पावसाने किंचित विश्रांती घेतली असली तरी सोमवारी अधून-मधून पावसाचा जोर राहील, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
---------------
१४, १५ सप्टेंबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल. समुद्र किनारी ताशी ५५ किमी वेगाने वारे वाहतील.
१६ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळेल. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल. समुद्र किनारी ताशी ५५ किमी वेगाने वारे वाहतील.
१७ सप्टेंबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात मुसळ्धार पाऊस कोसळेल. समुद्र किनारी ताशी ५५ किमी वेगाने वारे वाहतील.
---------------