अशोक खरातच्या पाठीशी ४० आमदार; 'ट्रायडेंट'मधून बदल्यांचे रॅकेट चालवायचा'; संजय राऊतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 12:21 IST2026-03-29T12:20:08+5:302026-03-29T12:21:10+5:30

मुंबईतील 'ट्रायडेंट' हॉटेलमधून शिक्षण विभागातील बदल्यांचे आणि बडतर्फीचे व्यवहार खरातच्या नेतृत्वाखाली चालत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. आज पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले.

40 MLAs behind Ashok Kharat; He used to run a transfer racket through Trident Sanjay Raut's serious allegation | अशोक खरातच्या पाठीशी ४० आमदार; 'ट्रायडेंट'मधून बदल्यांचे रॅकेट चालवायचा'; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अशोक खरातच्या पाठीशी ४० आमदार; 'ट्रायडेंट'मधून बदल्यांचे रॅकेट चालवायचा'; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई- "अशोक खरात हा भोंदू बाबा असून तो पूर्णपणे सरकारचा माणूस आहे. त्याच्या पाठीशी ४० आमदार आहेत," असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबईतील 'ट्रायडेंट' हॉटेलमधून शिक्षण विभागातील बदल्यांचे आणि बडतर्फीचे व्यवहार खरातच्या नेतृत्वाखाली चालत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. आज पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले.

'दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले तर अभिमान..."; आमदार सुनिल शेळकेंचे मोठे विधान

संजय राऊत म्हणाले की, अशोक खरात मंत्रालयातील अनेक मंत्र्यांच्या कामात थेट हस्तक्षेप करत होता. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खरातकडे नेणारे दीपक केसरकर होते. त्यामुळे शिंदे आणि केसरकर या दोघांचीही कडक चौकशी व्हायला हवी. तसेच खासदार सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचीही या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी राऊतांनी केली आहे.

 खरात अमित शाह यांच्यापर्यंत कसा पोहोचला?

अशोक खरात सारखी व्यक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कशी पोहोचली? असा सवाल उपस्थित करत राऊतांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज व्यक्त केली. खरातच्या संपत्तीबाबत सरकारने जनतेला उत्तर दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

इंधन टंचाईवरून सरकारवर टीका

राज्यातील इंधन टंचाईवर बोलताना राऊत म्हणाले, "छगन भुजबळ सांगतात की राज्यात गॅस टंचाई आहे, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात सर्व काही व्यवस्थित आहे. सरकारमध्येच ताळमेळ नाही. गुजरातमध्ये लॉकडाऊन होणार असल्याची माहिती आधीच फुटल्यामुळे तिथे गॅससाठी रांगा लागल्या आहेत, ही परिस्थिती चिंताजनक आहे.

महिलांचे शोषण हाच गंभीर गुन्हा

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पाणी वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले की, "जयंत पाटील यांनी पाणी दिले असेल तर त्यात काय चुकीचे आहे? पाणी देणे हा गुन्हा आहे का? पण त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे महिलांचे शोषण होणे. जर तिथे महिलांचे शोषण झाले असेल, तर तो सर्वात मोठा गुन्हा आहे आणि त्यावर सरकारने बोलावे.

Web Title : अशोक खरात को 40 विधायकों का समर्थन; तबादला रैकेट चलाया: राउत

Web Summary : संजय राउत का आरोप है कि अशोक खरात, जिसे 40 विधायकों का समर्थन प्राप्त है, ने मुंबई के ट्राइडेंट होटल से तबादला रैकेट चलाया, मंत्रीस्तरीय कार्यों को प्रभावित किया और महिलाओं का शोषण किया। राउत ने शिंदे, केसरकर, तटकरे और चाकणकर की जांच की मांग की, अमित शाह तक खरात की पहुंच और उनकी संपत्ति पर सरकार की चुप्पी पर सवाल उठाया। उन्होंने ईंधन की कमी की भी आलोचना की।

Web Title : Ashok Kharat backed by 40 MLAs; ran transfer racket: Raut

Web Summary : Sanjay Raut alleges Ashok Kharat, backed by 40 MLAs, ran a transfer racket from Mumbai's Trident Hotel, influencing ministerial work and exploiting women. Raut demands investigation into Shinde, Kesarkar, Tatkare, and Chakanakar, questioning Kharat's access to Amit Shah and government's silence on his assets. He also criticized fuel shortages.