मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोलसाठी निविदा सादर करण्याकरिता आता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 06:00 IST2019-12-14T05:14:10+5:302019-12-14T06:00:29+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलसाठी एजन्सी नेमण्याच्या निविदेला आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर टोलसाठी निविदा सादर करण्याकरिता आता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल गोळा करण्यासाठी एजन्सीच्या नेमणुकीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, ही मुदत वाढवून आता ३० डिसेंबरपर्यंत करण्यात आल्याचे एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलसाठी एजन्सी नेमण्याच्या निविदेला आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. यापूर्वी या मार्गावर टोल गोळा करण्याचे कंत्राट २००४ पासून आयआरबीकडे होते. नव्या निविदा प्रक्रियेतही आयआरबीने सहभाग घेतला आहे.
२००४ मध्ये देण्यात आलेल्या कंत्राटावेळी १५ वर्षांमध्ये नऊशे कोटी रुपये महसूल जमा होईल, असा अंदाज बांधला होता. परंतु वाहनचालकांना सोयीच्या ठरणाºया या मार्गावर चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुढील ११ वर्षांसाठी टोल जमा करण्याच्या कंत्राटासाठी किमान ९,३०० कोटींचा महसूल मिळेल, असा एमएसआरडीसीला विश्वास आहे. या महसुलातून एक्स्प्रेस-वेवर पायाभूत सुविधा विकासाची कामे करण्यात येतील. यासाठी सात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.