बनावट पेंटिंग्ज माथी मारून १८ कोटींचा गंडा; ताडदेव पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 09:43 AM2023-12-20T09:43:29+5:302023-12-20T09:44:08+5:30

मुंबईच्या इन्व्हेस्टमेंट बँकरला १७ कोटी ९० लाखांचा फटका.

18 crores of fraud by slapping fake paintings tardeo police are investigating | बनावट पेंटिंग्ज माथी मारून १८ कोटींचा गंडा; ताडदेव पोलिसांकडून तपास सुरू

बनावट पेंटिंग्ज माथी मारून १८ कोटींचा गंडा; ताडदेव पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : प्रसिद्ध कलाकारांच्या पेंटिंग मध्य प्रदेशचा राजा, आयएएस अधिकाऱ्यांकडून खरेदी केल्याचा बनाव करत मुंबईच्या इन्व्हेस्टमेंट बँकरला १७ कोटी ९० लाखांचा फटका बसला आहे. भिंतीवर लावलेल्या पेंटिंगबाबत अनेकांना संशय आल्याने पडताळणी केली. अखेर, चौकशीत ही पेंटिंग बनावट असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत ताडदेव पोलिसांनी सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

पुनित भाटिया (५२) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गतवर्षी जानेवारीत विश्वांग देसाई ॲडव्होकेट ॲण्ड पार्टनर मेसर्स देसाई आणि दिवानजी यांची मित्राच्या पार्टीमध्ये भेट झाली होती. देसाईने पेंटिंगमध्ये गेल्या २५ वर्षांचा अनुभव असून, आर्ट डीलरसोबत भेटीगाठी असल्याचे सांगितले. मेसर्स आर्ट इंडिया इंटरनॅशनल राजेश राजपाल हा आर्ट डीलर असल्याचे सांगून ओळख करून दिली. व्हाॅट्सॲपद्वारे आर्टिस्ट मनजित बावा यांची कृष्णा विथ काऊस यांची पेंटिंग आहे. पेंटिंगचे मालक सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सुब्रता बॅनर्जी  असून, पेंटिंग विकायचे असल्याचे सांगितले. एक आर्टिस्ट सुजा यांची पेंटिंग असून, त्याची किंमत पावणेदोन कोटी सांगितली. ही पेंटिंग मध्य प्रदेशच्या राजाकडून खरेदी करणार असल्याचा बनाव केला.


त्यांना संशय आला आणि...

  बावा आणि आर्टिस्ट एफ. एन. सुजा यांची पेंटिंग कुरिअरद्वारे दिल्ली येथील घराच्या पत्त्यावर आली. ती भिंतीवर लावली होती. 
  घरी आलेल्या मित्रांना पेंटिंगबाबत संशय आला. त्या पेंटिंग बनावट असल्याच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होताच, त्यांनी अधिकारी सुब्रतो बॅनर्जी यांच्याकडे चौकशी केली. 
  अशी कुठलीही पेंटिंग नसल्याचे सांगताच त्यांना धक्का बसला.

Web Title: 18 crores of fraud by slapping fake paintings tardeo police are investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.