दिंडोशीत रहदारीमुक्त रस्त्यावर १० हजार चिमुरडे सादर करणार आपली कला

By मनोहर कुंभेजकर | Published: December 2, 2023 07:09 PM2023-12-02T19:09:30+5:302023-12-02T19:09:42+5:30

स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे.

10000 children will perform their art on a traffic free road in Dindoshi | दिंडोशीत रहदारीमुक्त रस्त्यावर १० हजार चिमुरडे सादर करणार आपली कला

दिंडोशीत रहदारीमुक्त रस्त्यावर १० हजार चिमुरडे सादर करणार आपली कला

मुंबई - मुलांना खेळायला आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळत नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन स्वेट ऑन क्लब यांच्या सहकार्याने दिंडोशीत स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटचे आयोजन केले आहे.

दिंडोशीच्या रहेजा गार्डन येथील सुमारे एक किलो मीटर रहदरीमुक्त रस्त्यावर उद्या रविवार दि,3 डिसेंबर आणि  रविवार दि,10 डिसेंबर रोजी या दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील सुमारे 10000 ते 15000 लहान मुले आपल्या विविध कला येथे सादर करून त्यांचा मनमुराद आनंद लुटणार आहेत.

युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू आणि स्वेट ऑन क्लबच्या पुढाकाराने उद्या रविवारी रहदरीमुक्त स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटला दिंडोशी येथील रहेजा हाईट्स, वसंत व्हॅली, गोकुळ धाम, म्हाडा संकुल, न्यू म्हाडा, सॅटेलाईट कॉलनी, यशोधाम व्हॅलेंटाईन अपार्टमेंट, नागरी निवारा संकुल, सुचिधाम, दिंडोशी वसाहत, शिवशाही, श्रीकृष्ण, नगर संतोष नगर इत्यादी वसाहतीतील सुमारे दहा ते पंधरा हजार दिंडोशीवासी आपली कला सादर करणार आहे.

त्यासाठी  दिंडोशी नागरी निवारा समोर असलेल्या रहेजा हाईट्स ते रहेजा गार्डन हा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता उद्या दि,3 आणि पुढच्या रविवारी दि, 10 रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत रहदारीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे येथील रहदारीमुक्त रस्त्यावर चिमुरड्यांसह लहान मोठे सुद्धा या रस्त्यावर आपली कला सादर करता येणार असल्याची माहिती आयोजक अंकीत प्रभू यांनी लोकमतला दिली. 

या स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटमध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, कराटे, स्केटिंग, बुद्धिबळ, असे वेगवेगळे खेळ, व्यायाम व फिटनेस प्रकार, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, कॅनव्हास पेंटिंग, थिएटर वर्कशॉप, श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगने केलेले योगाची प्रात्यक्षिके, ब्रह्मकुमारीचे मानसिक स्वास्थ्य कसे मिळवायचे आणि आलेल्या अडचणींवर कसे मिळवायचे यावर उपाय आदी कलागुणांना देणारे प्रकारांचा आनंद लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना लुटता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 10000 children will perform their art on a traffic free road in Dindoshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई