Join us  

Zero Teaser : शाहरुख बसला सलमानच्या कडेवर, 'झिरो'चा नवा धमाकेदार टीझर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 1:12 PM

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'झिरो' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. ईद काही दिवसांवर आलीये आणि अशात या सिनेमाचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 

मुंबई : शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'झिरो' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. ईद काही दिवसांवर आलीये आणि अशात या सिनेमाचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 

या टीझरमधून असे दिसते आहे की, सलमान खान सुद्धा या सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या टीझरमध्ये दोघांची खास केमिस्ट्री बघायला मिळत आहे. 

शाहरुख खान याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा टीझर शेअर करुन एक मजेदार मेसेजही लिहिला आहे. शाहरुख आणि सलमान यांना एकत्र बघण्यात त्यांच्या चाहत्यांना नेहमी आनंद मिळतो. दोघांनी सोबत सिनेमा करावा अशी अनेकांची इच्छा आहे पण दोघे केवळ ऐकमेकांच्या सिनेमात छोट्या भूमिका करताना बघायला मिळतात. शाहरुख सुद्धा सलमानच्या याआधीच्या ''ट्यूबलाईट' सिनेमात शाहरुख पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता.

टॅग्स :झिरो सिनेमासलमान खानरमजान ईदशाहरुख खानबॉलिवूड