Join us  

ठाण्यात रंगणार झी युवा दांडिया २०१८

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 5:30 PM

झी युवावरील कलाकारांना एकत्र पाहण्याची नामी संधी ठाण्यातील प्रेक्षकांसाठी झी युवा घेऊन आली आहे .

ठळक मुद्देझी युवावरील कलाकारांना पाहण्याची ठाणेकरांना संधी

झी युवाने फक्त मालिकांद्वारे नव्हे तर प्रेक्षकांसोबत अनेक कार्यक्रमांद्वारे देखील एक वेगळे व घट्ट नाते निर्माण केले आहे. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊनच वाहिनीने वेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या मालिका आणि ऑनग्राउंड इव्हेंट्सद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. प्रत्येक मंडळात दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी मुलामुलींचा उत्साह उल्लेखनीय आहे. झी युवा या वाहिनीने पहिल्यांदाच नौपाडा ठाणे येथे १५ ऑक्टोबरला 'श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान'च्या सहकार्याने  भगवती शाळेचे मैदानात झी युवा दांडिया २०१८ चे आयोजन संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत केले आहे.

झी युवा दांडियामध्ये झी युवा वाहिनीवरील मालिकांपैकी 'फुलपाखरू'तील ऋता दुर्गुळे आणि यशोमान आपटे आणि टीम, 'बापमाणूस'मधील  सुयश टिळक, श्रुती अत्रे व पल्लवी पाटील आणि टीम, 'आम्ही दोघी'मधील विवेक सांगळे, खुशबू तावडे व प्रसिद्धी किशोर आणि टीम, 'तू अशी जवळी राहा'मधील सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे आणि टीम तसेच 'सूर राहू दे'मधील संग्राम साळवी आणि गौरी नलावडे आणि टीम या सर्व कलाकारांचा समावेश असेल. झी युवावरील एवढे सर्व कलाकार एकत्र एका जागी पाहण्याची नामी संधी ठाण्यातील प्रेक्षकांसाठी झी युवा घेऊन आली आहे .ठाण्यातील झी युवाच्या प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत दांडिया खेळण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. 

टॅग्स :फुलपाखरूसूर राहू देआम्ही दोघी मालिका