Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला जपणार आहे', झी मराठीवर सुरू होणार नवीन हॉरर मालिका, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 09:47 IST

'रात्रीस खेळ चाले', 'ती परत आलीये' या हॉरर मालिकांना चाहत्यांकडून प्रेम मिळाल्यानंतर आता नवीन हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अलिकडेच झी मराठी वाहिनीवर 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका सुरू झाली. त्यानंतर 'लक्ष्मी निवास' ही नवी मालिकाही लवकरच सुरू होणार आहे. अशातच झी मराठीने चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राइज आणलं आहे. 'रात्रीस खेळ चाले', 'ती परत आलीये' या हॉरर मालिकांना चाहत्यांकडून प्रेम मिळाल्यानंतर आता नवीन हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. 'तुला जपणार आहे' असं या मालिकेचं नाव आहे. "दिसत नसली तरीही असणार आहे...तुला जपणार आहे" असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये म्हटलं गेलं आहे.  या प्रोमोमध्ये जंगलातील एका वाड्यात एक लहान मुलगी आणि एक साडी नेसलेली बाई दिसत आहे. एका आरश्यासमोर त्या दोघीही उभ असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

"कधीही न दिसणारी आणि तरीही जाणवणारी ही सावली नेमकी कोणाची? 'तुला जपणार आहे' लवकरच", असं म्हणत झी मराठीच्या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकार