Join us

Bigg Boss Marathi 2 : या सदस्याची आई म्हणाली शिवानीला, तू एका आईचं मनं दुखावलंस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 16:57 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या टास्कमध्ये सदस्यांच्या परिवारातील खास व्यक्ति त्यांना भेटायला येत आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या टास्कमध्ये सदस्यांच्या परिवारातील खास व्यक्ति त्यांना भेटायला येत आहेत. काल घरामध्ये वीणाची आई येऊन गेली. त्यांनी काही सदस्यांना त्यांच्या चुका सांगितल्या तर काही सदस्यांना ते चांगले खेळत आहेत हे देखील सांगितले.  वीणाच्या आईने शिवानीला तिच्याकडून झालेल्या चुका सांगितल्या.  त्यांचे म्हणणे होते, तू वीणाला लाथ मारलीस, वीणाबद्द्ल वैयक्तिक गोष्टींवर बोलली.. यावर त्या असे देखील म्हणाल्या तुला काही अधिकार नाहीये असे बोलण्याचा. आम्ही आहोत ते बघायला आम्ही तिचे पालक आहोत.

 तुला गरज नाहीये तिच्या वैयक्तिक आयुष्यावर काहीही बोलायची आणि रूपालीसोबत ती वीणाबद्दल जे काही बोलली ते चुकीचे होते, तिची मी बाहेरून माहिती काढून आली आहे, तू हे सगळ बोलायला नको होतस शिवानी... तुझ्या वैयक्तिक आयुष्यावर कोणी काही बोलल तर तू पण चिडतेस ना ? तिने तरी तुझ्या आई वडिलांची माफी मागितली... तू कधी माफी मागितलीस ? तू पण एका आईचे मन दुखावले आहेस”... रूपालीला देखील वीणाच्या आईचे म्हणणे होते इतक सगळ जेव्हा शिवानी बोलली तिच्याबद्दल तू गप्पपणे सगळ ऐकून घेतलस, तुझी मैत्रीण होती ना वीणा ? तू का नाही उत्तर दिलंस तेव्हा तिला...यानंतर शिवानीने आणि रूपालीने वीणाच्या आईची माफी मागितली...

टॅग्स :बिग बॉस मराठीवीणा जगतापशिवानी सुर्वे