Join us  

'माझ्यासाठी प्रार्थना करा...', 'ये रिश्ता क्या कहलाता है'फेम राजश्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 12:53 PM

अभिनेत्रीची प्रकृती ठीक नाही. तिच्या तब्येतीबद्दल मोठे अपडेट देताना तिने चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.

प्रसिद्ध टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' या प्रसिद्ध मालिकेमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आजही लक्षात असतील. मालिकेत अक्षराच्या आईची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री लता सभरवालने साकारली होती. राजश्री नावाने घराघरात प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीची प्रकृती सध्या फारशी ठीक नाही. तिच्या तब्येतीबद्दल मोठे अपडेट देताना तिने चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील राजश्री म्हणजेच लता सभरवालने आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आणि लोकांच्या मनावर राज्य केले. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र सध्या तिच्या एका पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.

लता सभरवालने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिला गळ्यामध्ये गाठी तयार झाल्या आहेत. त्यावर वेळीच उपचार न केल्यास तिचा आवाजही जाऊ शकतो.

लता सभरवालची पोस्ट त्याने आपल्या पोस्टमध्ये चाहत्यांना सांगितले की, ' माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या गळ्यात गाठी तयार झाल्या आहेत. त्यामुळे मला बोलण्यात अडचण येत आहे. मी नुकतेच ईएनटी (कान, नाक आणि घशाचे डॉक्टर) कडून जाऊन आले. त्यांनी मला माझ्या घशात गाठ झाल्याचं सांगितलं आहे. मला आठवडाभर पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला स्टिरॉइड्स देण्यात आले आहेत कारण हा एकमेव उपचार आहे. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे, जर मी लक्ष दिले नाही तर माझा आवाज कायमचा जाऊ शकतो. मला थोडी भीती वाटते.

लता सबरवालने 1999 साली ‘गीता रहस्य’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर डेब्यू केला होता. या मालिकेत तिने द्रौपदीची भूमिका साकारली होती. यानंतर तिने डझनावर मालिकेत काम केले. जन्नत, कहता है दिल, शाका लाका बूम बूम, आवाज- दिल से दिल तक, दिशाएं, खुशियां, वो रहने वाली महलों की, नागीन, घर एक सपना, वो अपना सा, ये रिश्ते प्यार के, इश्क में मरजांवा अशा मालिकेत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. 

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैटिव्ही कलाकार