Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिला योवोव्हिचला करायचेय सलमान खानसोबत काम

By admin | Updated: February 1, 2017 03:00 IST

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. मिला योवोव्हिचसारखी हॉलिवूड स्टार सलमानसोबत काम करण्याची इच्छा बाळगून आहे.

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. मिला योवोव्हिचसारखी हॉलिवूड स्टार सलमानसोबत काम करण्याची इच्छा बाळगून आहे. एका मुलाखतीमध्ये तिने सल्लूमियासोबत एकत्र चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली की, ‘एकदा मी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेथे बाहेर खूप गर्दी जमा झाली. मला वाटले ते सर्व माझे फॅन्स आहेत; परंतु तेवढ्यात एक व्यक्ती बाहेर आली आणि सगळे लोक वेडे झाल्यागत ओरडू लागले. अशी मॅडनेस मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.’ जेव्हा तिने माहिती काढली तेव्हा तिला कळाले की, लोक ज्याच्यासाठी वेडे झाले तो बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार सलमान खान आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर काय करशील असे विचारले असता ती म्हणाली की, ‘मी आनंदाने काम करेन. त्याच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे. आता हे खरं आहे की, हिंदी चित्रपटासाठी लागणारे नाचगाणे मला येत नाही; पण मी ते शिकून घेईन.’ मिला योवोव्हिच येत्या ३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘रेसिडेंट ईव्हिल : द फायनल चाप्टर’ सिनेमात दिसणार असून, या सिरीजमधील हा शेवटचा चित्रपट असणार आहे.