Gharoghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. प्रआता लवकरच या मालिकेत प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रणदिवेंच्या घरात ऋषिकेशची आई असल्याचं सांगत आलेल्या पार्वतीचं जानकीसोबत कनेक्शन असल्याचं आता समोर येणार आहे. त्यामुळे या मालिकेत रंजक वळण आलं आहे. नानासाहेबांची पहिली पत्नी असल्यांच सोंग घेतलेल्या पार्वतीचं सत्य सर्वासमोर उघड होणार आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर स्टार प्रवाह वाहिनीने 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये ओवीकडून पार्वतीला जानकीच तिची लेक असल्याचं समजतं. परंतु, याबाबत जानकीला कोणतीही कल्पना नाही. आपली लेक समोर असूनही तिला खरं काय ते सांगता येत नसल्याने पार्वतील अश्रू अनावर होतात. आता पार्वती आणि जानकीची भेट होणार या भीतीने ऐश्वर्याने नवा प्लॅन रचला आहे. पार्वती सगळं काही सांगणार इतक्यात घरातील झुमर ऐश्वर्या खाली पाडते. त्याच झुमरखाली जानकी आणि पार्वती उभ्या असतात. त्यामुळे आता पुढे काय घडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका दररोज सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होते. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांचं लाडकं झालं आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे, सुमीत पुसावले, सविता प्रभूणे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. आता या मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.