Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला पाहते रे'मध्ये विक्रांतच्या त्या खोलीतील रहस्य ईशाला कळणार का?, काय असेल ईशाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 18:05 IST

विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांचा विवाह नुकताच पार पडला आणि ईशा सरंजामे कुटुंबात हळूहळू रमू लागलेली पाहायला मिळते आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकतेच विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांचा विवाह पार पडला आणि ईशा सरंजामे कुटुंबात हळूहळू रमू लागलेली पाहायला मिळते आहे. मात्र या सरंजामेंच्या अलिशान घरातील एक खोली रहस्यमय आहे. या खोलीत फक्त विक्रांतच जाऊ शकतो. या खोलीत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. 

विक्रांत व ईशाच्या लग्नाच्या आधीपासून विक्रांत एका खोलीत जाऊन बराच वेळ व्यतित करतो, हे पाहायला मिळाले. मात्र विकीशाच्या लग्नानंतर विक्रांत दररोज त्या खोलीत जाताना पाहायला मिळतो. लग्नाच्या दिवशी ईशा त्या खोलीचे दार वाजवते म्हणून विक्रांत तिच्यावर चिडतो आणि तिला हा दरवाजा वाजवायचा नाही, असे सांगतो. त्यामुळे ईशादेखील ह्या खोलीत काय असे आहे जे विक्रांत सरांनी माझ्यापासून लपवले आहे, हा प्रश्न पडतो. मात्र विक्रांत सरांवर अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल म्हणून ती गप्प आहे.

मात्र आता या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर दाखल झाला आहे. ज्यात सान्या विक्रांतला त्या खोलीबद्दल विचारते आणि ती खोली सर्वांसाठी खुली करण्याबाबत सांगते आणि ईशाचे देखील नाव पुढे करते. त्यामुळे विक्रांत ईशावर वैतागतो, असे या प्रोमोत दाखवण्यात आले आहे. हा प्रोमो पाहिल्यावर या खोलीतील रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमधील आणखीन वाढली आहे. मात्र लवकरच विक्रांतच्या ह्या खोलीतील रहस्य लवकरच उघडकीस येणार आहे. या खोलीतील रहस्य जाणून घेणे कमालीचे ठरणार आहे.  

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे गायत्री दातार