Join us  

टीव्हीवरील कॉमेडियनच्या कमाईचा आकडा वाचून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 12:32 PM

खासकरून टीव्हीवरील कॉमेडियनला किती पैसे मिळतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल.

बॉलिवूड स्टार्सची कमाई तशी मीडियात चांगलीच चर्चेत असते, पण टीव्ही कलाकारांच्या कमाईबद्दल फारसं कुणाला माहित नसतं. खासकरून टीव्हीवरील कॉमेडियनला किती पैसे मिळतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. काही कॉमेडियनच्या कमाईबाबत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. त्यांच्या कमाईचा आकडा जाणून घेतल्यावर  तुम्हाला धक्का बसेल.

कपिल शर्मा:

सर्वातआधी पाहूया कपिल शर्माची कमाई किती आहे ती. सर्वात जास्त कमाई करणा-या कॉमेडियनच्या यादीत कपिल शर्माचं नाव आघाडीवर आहे. कपिल शर्मा हा ‘द कपिल शर्मा शो’च्या एका एपिसोडसाठी 70 ते 80 लाख रूपये घेत होता. यानुसार तो एका महिन्यात 6 ते 7 कोटींची कमाई करत होता. यासोबत लाईव्ह शोसाठी त्याचं मानधन 1 कोटी रूपये इतकं आहे. हे मानधन आलिया भट्ट, टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरपेक्षा अधिक जास्त आहे. तो वर्षाला 15 कोटींचा इन्कम टॅक्स भरतो त्यानुसार त्याच्या कमाईचा अंदाज लावला जाऊ शकतो. 

कृष्णा अभिषेक:

भारतातील दुसरा सर्वात महागडा कॉमेडियन म्हणजे कृष्णा अभिषेक. कपिल आणि कृष्णा यांची तुलना केली जाऊ शकत नाही पण त्याचीही कमाई इतरांपेक्षा खूप जास्त आहे. सर्वात जास्त कमाई करणा-या कमाईच्या यादीत 98 व्या क्रमांकावर कृष्णा आहे. तो एका एपिसोडसाठी 32 ते 35 लाख रूपये घेतो. तसेच सुदेश लेहरीसोबत लाईव्ह शो करण्यासाठी तो 15 लाख रूपये घेतो. 

भारती सिंह:

कॉमेडी क्वीन भारती सिंहला आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. भारतीने आज इंडस्ट्रीत तिचं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय. त्यामुळे तिची किंमतही वाढली आहे. भारती एका दिवसाच्या शोसाठी 25 ते 30 लाख रूपये घेते. इतकेच नाहीतर ‘नच बलिये’ मध्ये आपल्या बॉयफ्रेण्डसोबत थिरकण्यासाठी तिने एका एपिसोडचे 30 लाख रूपये घेतले होते.

सुनील ग्रोव्हर:

सुनील ग्रोव्हर हा कपिलच्या शोमधून तितकाच लोकप्रिय झाला जितका कपिल झाला. पण या दोघांच्याही कमाईत बराच फरक आहे. सुनील एका दिवसासाठी 8 ते 10 लाख रूपये चार्ज करतो. त्यासोबतच तो कॉर्पोरेट इव्हेंट, लाईव्ह शो आणि लग्नामध्ये परफॉर्म करण्यासाठी 10 ते 15  लाख रूपये घेतो.

टॅग्स :टेलिव्हिजन