Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेनेलिया देशमुखने 21 दिवसानंतर कोरोना रिपोर्टबद्दल केला खुलासा, लिहिली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 10:15 IST

रितेश देशमुखच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

ठळक मुद्दे जेनेलियाने आपल्या चाहत्यांनाही संदेश दिला. जराही शंका असल्यास कोरोना टेस्ट करा. स्वस्थ राहा, पौष्टिक अन्न खा आणि या राक्षसाला दूर फेका, असे तिने म्हटले.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. देशातही कोरोनाचा कहर सुरु आहे. बॉलिवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. आता अभिनेता रितेश देशमुख याच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख हिने खुद्द सोशल मीडियावर याची माहिती दिली. तीन आठवड्यांपूर्वी  जेनेलियाला कोरोनाची लागण झाली होती. तथापि आता ती कोरोनामुक्त झालीय. 21 दिवसांनी तिची चाचणी निगेटीव्ह आली.

जेनेलियाने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली. ‘तीन आठवड्यांपूर्वी मी कोरोना पॉझिटीव्ह आढळली. गेल्या 21 दिवसांपासून कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती. आज माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला. सर्व लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी कोरोनावर मात करू शकले,’ असे जेनेलियाने लिहिले.

तिने पुढे लिहिले, ‘हे 21 दिवस कठीण होते. तुम्ही डिजिटली एकमेकांच्या कितीही जवळ असाल पण हे आभासी जग तुमचा एकाकीपणा दूर करू शकत नाही. आपल्यावर प्रेम करणारी माणसं आणि कुटुंब हे आपली ऊर्जा, क्षमता वाढवण्यासाठी कायम मदत करत असतात. मी कोरोनाला हरवून माझ्या कुटुंबात परतले याचा मला आनंद आहे.’

 जेनेलियाने आपल्या चाहत्यांनाही संदेश दिला. जराही शंका असल्यास कोरोना टेस्ट करा. स्वस्थ राहा, पौष्टिक अन्न खा आणि या राक्षसाला दूर फेका, असे तिने म्हटले.जेनेनियाआधी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन असे बच्चन कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचाराअंती या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.

 

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुख