Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाची पन्नाशी उलटली तरी अमिषा पटेलनं का केलं नाही लग्न? या कारणामुळे आहे ती सिंगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:07 IST

Ameesha Patel : प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त अमिषा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. ती ५० वर्षांची झाली आहे, पण अद्याप तिने लग्न केलेले नाही.

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल(Ameesha Patel)ने हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून पदार्पण केले. अमिषा पटेल तिच्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाली. त्यानंतर ती 'गदर'ची सकीना बनली आणि तिचे स्टारडम द्विगुणित झाले. तिच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत अमिषा पटेलने हिंदी तसेच साउच्या चित्रपटांमध्ये काम केले. प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त अमिषा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. ती ५० वर्षांची झाली आहे, पण अद्याप तिने लग्न केलेले नाही. एकदा तिने लग्न न करण्यामागील कारण सांगितले होते.

एकदा फिल्मी मंत्रला दिलेल्या मुलाखतीत अमिषा पटेलने तिने अद्याप लग्न का केलं नाही, याचा खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, माझे आयुष्य ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावर मी खूप आनंदी आहे असे मला वाटते. मला सहवासाची कमतरता वाटत नाही. मी माझ्या कामात इतकी व्यग्र असते की माझ्याकडे त्यासाठी वेळच नसतो.

अमिषा पटेलला असा हवाय नवराअमिषा पटेलने असेही म्हटले होते की, आतापर्यंत तिला हवी असलेली व्यक्ती सापडलेली नाही. ती म्हणाली की ती जशी आहे तशीच आनंदी आहे. अमिषा पुढे म्हणाली होती की, एखाद्या पुरूषाने तुमच्या सावलीत राहणे ही खूप मोठी गोष्ट आहे. ते खूप कठीण आहे. अर्थात त्याला माझ्या आनंदाला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व द्यावे लागेल आणि कामाचे लांब तास, अनियमित वेळापत्रक, कामाच्या बांधिलकी, वेडा प्रवास समजून घ्यावा लागेल. या सगळ्यामध्ये मी नात्याला वेळ कसा देऊ शकते? मला वाटत नाही की मी कोणत्याही नात्याला न्याय देऊ शकेन.

अमिषा पटेलचे नाव या अभिनेत्यांसोबत जोडलं गेलंय नावअमिषा पटेलचे लग्न झाले नसले तरी तिचे नाव अनेक बॉलिवूड स्टार्सशी जोडले गेले आहे. तिने सुमारे पाच वर्षे विक्रम भटला डेट केले. ब्रेकअपनंतर अभिनेत्री म्हणाली की, दिग्दर्शकाला डेट करणे ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. विक्रम भट व्यतिरिक्त, अमिषा पटेलचे नाव उद्योगपती कणव पुरी, कुणाल गुमर, निर्वाण पटेल यांच्याशी जोडले गेले आहे. एकेकाळी अमिषाचे नाव रणबीर कपूरसोबतही जोडले गेले होते. मात्र, नंतर अभिनेत्रीने ते नाकारले.

टॅग्स :अमिषा पटेल