Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेव्ह पार्टीत पोलिसांनी अटक केलेली ही हिना पाचांळ आहे तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:57 IST

मराठी इंडस्ट्रीतही बोल्ड आणि बिनधास्त अशी हिना पांचाळची ओळख बनत चालली आहे.

ठळक मुद्देसोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवरील हिनाच्या बिकीनी अवतारातील हॉट आणि सेक्सी फोटोंवर तिचे चाहते नेहमीच घायळ होतात.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन कोरिओग्राफर, तमीळ आणि काही हिंदी चित्रपटांत भूमिका साकारलेल्या दोन अभिनेत्री, एका रिॲलिटी-शोमधील अभिनेत्रींसह १० पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २२ व्यक्तींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीच्या दोन आलिशान बंगल्यात रेव्ह पार्टी करताना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी मुंबईतून एका नायजेरियन नागरिकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या अभिनेत्रींमध्ये हिना पांचाळचा समावेश आहे. 

मराठी इंडस्ट्रीतही बोल्ड आणि बिनधास्त अशी हिना पांचाळची ओळख बनत चालली आहे. सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर करत असते. हिनाने दाक्षिणात्य सिनेमातही काम केले आहे. 'मराठी बिग बॉस'शोमुळेच ती प्रकाशझोतात आली. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात हिनाचे फोटो तिच्या अंकाऊंटवर पाहायला मिळतात.

सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवरील हिनाच्या बिकीनी अवतारातील हॉट आणि सेक्सी फोटोंवर तिचे चाहते नेहमीच घायळ होतात. तिच्या या सेक्सी अंदाजावर नेटकरी फिदा असतात. तिच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा नेहमीच वर्षाव सुरू असतो. कायमच विविध अंदाजात ती फोटोशूट करताना दिसून येते.

टॅग्स :हिना पांचाळबिग बॉस मराठी