Join us

प्रेयसीच्या आईवडिलांना पाहून सलमान खानला फुटला होता घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 13:14 IST

सलमानने नुकताच त्याच्या एका प्रेयसीसोबतचा किस्सा मीडियासोबत शेअर केला होता. प्रेयसीच्या घरात त्याला आणि प्रेयसीला पालकांनी पकडल्यानंतर त्याची काय अवस्था झाली होती हे त्याने सांगितले होते.

सलमान खान आज बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक आहे. सलमानला बॉलिवूडचा दबंग खान असे म्हटले जाते. दस का दम हा त्याचा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत असून बिग बॉस या कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमानने नुकताच त्याच्या एका प्रेयसीसोबतचा किस्सा मीडियासोबत शेअर केला होता. सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, हा किस्सा खूप वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी मी बॉलिवूडमध्ये प्रवेश देखील केला नव्हता. मी माझ्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलो होतो. त्यावेळी तिचे पालक घरी नव्हते. पण अचानक तिचे आई-वडील घरी परतले. त्यांना पाहून मला चांगलेच टेन्शन आले होते. त्यांना पाहून मला प्रचंड घाम फुटला होता. मी त्यांना पाहाताच लपण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझी प्रेयसी आम्ही दोघेही एका कोठडीत लपलो. पण तिथे खूप धूळ होती आणि त्यामुळे मला शिंक आली. मी शिंकल्याने मला त्यांनी पकडले. आता माझी काही खैर नाही असेच मला वाटत होते. पण त्यांना मी खूप आवडत होतो. त्यामुळे त्यांनी काहीही न बोलता मला जाऊ दिले. हा किस्सा माझ्या कायम स्मरणात राहिला. 

सलमानच्या आयुष्यातील ती प्रेयसी कोण हे मात्र सलमानने मीडियाला सांगितले नाही. पण सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याचे अफेअर शाहीन जाफरीसोबत होते. शाहीन ही प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांची नात आहे. अशोक कुमार यांची मुलगी भारतीने प्रसिद्ध अभिनेते सईद जाफरी यांचा भाऊ हामिद जाफरीसोबत लग्न केले होते. त्यांनी मुलगी शाहीन असून तिने मॉडलिंग देखील केलेले आहे. सलमान कॉलेजमध्ये असताना त्याचे शाहीनसोबत अफेअर होते असे म्हटले जाते. जसीम खान यांनी सलमानच्या बीइंग सलमान या बायोग्राफीमध्ये शाहीन सलमानची पहिली प्रेयसी होती असा उल्लेख केलेला आहे. आता ती शाहीन होती की त्याची दुसरी कोणी प्रेयसी होती, हे केवळ सलमानच सांगू शकतो.

टॅग्स :सलमान खानदस का दमबिग बॉस 12