सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंती निमित्त ३ जानेवारी हा दिवस भारतात शिक्षणाच्या क्षेत्रात आणि सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वाचा मानला जातो. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. आज सावित्रीबाई फुले यांची १९४वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने अभिनेत्री नम्रता आवटे-संभेराव (Namrata Awate-Sambherao) हिने सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत आभार मानले आहेत.
नम्रता संभेराव हिने लिहिले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे. मुलींना शिक्षण मिळावं म्हणून सावित्रीबाई महात्मा जोतिबा फुले तुम्ही कसलीच परवा न करता लढत राहिलात आणि पहिली महिला शिक्षिका झालात आणि आणि मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लढलात म्हणून आज ताठ मानेने आम्ही समाजासमोर वावरू शकतो. तुम्ही आत्मविश्वास निर्माण केलात. माउली थोर तुझे उपकार. आज नवीन वर्षातला २०२५ मधला पहिला सण म्हणजे सावित्री उत्सव हा आनंदाचा ज्ञानाचा सोहळा आपण ज्ञानाचा दिवा उंबऱ्यावर लावून साजरा करूया.
वर्कफ्रंटनम्रता संभेराव हिने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून लोकांचे खूप मनोरंजन केले आणि या शोमधून ती घराघरात पोहोचली. नम्रताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. शेवटची ती नाच गं घुमा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. त्यानंतर आता 'थेट तुमच्या घरातून' या नाटकातून नम्रता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.