Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचायत सीझन २’ ने पटकावला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार

By संदीप आडनाईक | Updated: November 28, 2023 22:14 IST

पुरस्कारासाठी १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दहा भाषांमधील ३२ प्रवेशिका आल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क 

पणजी : गोवा येथील ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पंचायत सीझन २ या हृदयस्पर्शी हिंदी विनोदीनाट्य मालिकेने प्रतिष्ठित पहिला सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी ) पुरस्कार २०२३ पटकावला आहे. मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते इफ्फी मध्ये सांगता सोहळ्यात मगळवारी हा पुरस्कार देण्यात आला.

 दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित आणि चंदन कुमार लिखित ही मालिका ओटीटी पोर्टल अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित केली जात आहे. अभय पन्नू यांचा रॉकेट बॉईज सीझन १, राहुल पांडे आणि सतीश नायर यांचे निर्मल पाठक की घर वापसी आणि विपुल अमृतलाल शाह आणि मोजेझ सिंग दिग्दर्शित ह्यूमन यांचा समावेश असलेल्या या श्रेणीतील अंतिम नामांकनांतून  पंचायत सीझन २ ही वेब सिरीज उत्कृष्ट ठरली.

निवड समितीने  एकमताने सोनी लिव्ह वर दाखवल्या जाणाऱ्या  रॉकेट बॉईज सीझन १ या वेब सिरीजला विशेष उल्लेख म्हणून गौरवण्याची शिफारस केली आहे. या पुरस्कारासाठी १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दहा भाषांमधील ३२ प्रवेशिका आल्या होत्या.

टॅग्स :वेबसीरिज