Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पंचायत 4' कधी येणार? नवी अपडेट समोर, 'या' दिवशीपासून होणार शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 17:32 IST

'पंचायत' सीरिजचे असंख्य चाहते आहेत. सर्वच चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

'पंचायत' (Panchayat) या सीरिजचे तर अनेक चाहते आहेत. या हलक्या फुलक्या सीरिजने सगळ्यांनाच प्रेमात पाडलं आहे. सीरिजचे आतापर्यंत ३ सीजन आले. तिसऱ्या सीझनचा शेवट तर अगदीच इंटरेस्टिंग वळणावर झाला. त्यामुळे सर्वांनाच चौथ्या सीझनची उत्सुकता लागली आहे. पुढच्या सीझनसाठी चाहत्यांना किती वाट बघावी लागणार तर याविषयी नुकतीच अपडेट समोर आली आहे.

 पंचायत 4 च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव, चंदन रॉय, फैजल मलिक यासोबत इतरही कलाकारांनी सीरिजचे तीन सीझन गाजवले आता. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या २५ ऑक्टोबरपासून चौथ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. याची स्क्रीप्ट तयार आहे. मेकर्सनेही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे लवकरच शूटिंगला सुरुवात होऊन पुढच्या दोन वर्षात सीरिज प्रदर्शित होईल असा अंदाज आहे. 

'पंचायत' सीरिज 'फुलेरा'या मध्य प्रदेशातील छोट्या गावाची आहे. या गावात सचिव बनून आलेला अभिषेक त्रिपाठी(जितेंद्र कुमार)भोवती सीरिजची कहाणी आहे. गावातील प्रधान, सरपंच, गावकरी, आमदार अशा सर्वांचीच यामध्ये भूमिका आहे. दीपक मिश्रा यांनी सीरिज दिग्दर्शित केली आहे. चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :वेबसीरिजनीना गुप्ता