Matka King Season 2: विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेली 'मटका किंग' ही वेब सीरिज अलिकडेच प्रदर्शित झाली. एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेल्या या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सई ताम्हणकर, कृतिका कामरा, सिद्धार्थ जाधव, गुलशन ग्रोवर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'मटका किंग'च्या दुसऱ्या सीझनची आता घोषणा झाली आहे. लवकरच 'मटका किंग २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'मटका किंग २'चं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरवर विजय वर्माच्या हातात पत्ते दिसत आहेत. ज्यावर Season 2 असं लिहिलं आहे. पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रतिसादानंतर या वेब सीरिजच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून चाहत्यांची 'मटका किंग २' बद्दलची प्रतिक्षा वाढली आहे. या दुसऱ्या सीझनची रिलीज डेट अद्याप सांगण्यात आलेली नाही. रिलीज झाल्यानंतर अॅमेझॉन प्राइमवर 'मटका किंग २' प्रेक्षकांना पाहता येईल.
'मटका किंग'ची कथा काय?
'मटका किंग'ची कहाणी ही ६०च्या दशकातील ब्रीज भट्टीवर आधारित आहे. जो अवैध पद्धतीने मटका म्हणजेच जुगाराचा खेळ चालवत असतो. एका कापसाच्या व्यापाराकडे काम करणारा ब्रीज भट्टी मटका चालवून त्याचं आयुष्य कसं बदलतो, हे सीरिजमध्ये दिसते. ही वेब सीरिज एका सत्य घटनेवर आधारित आहे.
'मटका किंग'मध्ये विजय वर्माने ब्रीज भट्टीची भूमिका साकारली आहे. तर सई ताम्हणकर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. कृतिका कामरा, सिद्धार्थ जाधव, गुलशन ग्रोव्हर, भरत जाधव, गिरिश कुलकर्णी, जेमी लिव्हर, किशोर कदम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अॅमेझॉन प्राइमवर ही सीरिज उपलब्ध आहे.
Web Summary : Vijay Varma's 'Matka King' season 2 is coming soon after a successful first season. The series features Sai Tamhankar and Gulshan Grover. The release date is yet to be announced, but it will be available on Amazon Prime.
Web Summary : विजय वर्मा की 'मटका किंग' का सीजन 2 पहले सीजन की सफलता के बाद जल्द ही आ रहा है। सीरीज में सई ताम्हणकर और गुलशन ग्रोवर हैं। रिलीज की तारीख अभी घोषित नहीं की गई है, लेकिन यह अमेज़न प्राइम पर उपलब्ध होगी।