Join us  

बॉलिवूडमधील सर्वात कंजूष व्यक्ती कोण? फराह खानने 'या' अभिनेत्याचं नाव घेत थेट फोनच लावला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:32 PM

बॉलिवूडमधील सगळ्यात कंजूष व्यक्तीला फराह खानने लाईव्ह शोमध्ये फोन लावून पैशांची मागणी केली. पुढे काय घडलं बघा. (kapil shara, farah khan)

कपिल शर्माचं होस्टींग असलेला 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ची उत्सुकता आहे. कपिलच्या या शोमध्ये विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. आता या शोच्या नवीन एपिसोडमध्ये फराह खान आणि अनिल कपूर या सुप्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यावेळी कपिलने दोन्ही सेलिब्रिटींना विविध प्रश्नांवर बोलतं केलं. त्यावेळी बॉलिवूडमधला सर्वात कंजूष व्यक्ती कोण? असा प्रश्न विचारला. तेव्हा फराहने एका अभिनेत्याचं नाव घेतलं. त्यामुळे सर्वच जण हसायला लागले.

कोण आहे इंडस्ट्रीतील सर्वात कंजूष व्यक्ती

कपिलने फराह खानला विचारलं बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कंजूष व्यक्ती कोण? तेव्हा फराह खान म्हणाली, "मी तुम्हाला सांगते इंडस्ट्रमधील सर्वात जास्त कंजूष व्यक्ती. तो आहे चंकी पांडे. मी त्याला आता फोन करते आणि ५०० रुपये मागते."  फराहने खुलासा केल्यावर तिने खरंच चंकीला फोन केला. LIVE शो मध्ये फराहने चंकीकडे ५०० रुपयांची मागणी केल्यावर पुढे काय घडलं बघा.

फराह खान - चंकीमधलं संभाषण

फराह खान: "चंकी,  ऐक मला ५०० रुपये हवेत"

चंकी पांडे: "मग ATM मध्ये जा ना"

फराह खान: "अरे चंकी ५०० नाही तर कमीत कमी ५० रुपये तर दे"

चंकी पांडे: "हॅलो! कोण हवंय आपल्याला"

अशाप्रकारे 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये फराह खान आणि चंकी पांडे यांच्यात लाईव्ह शोदरम्यान मजा-मस्ती दिसून आली. या शोचा हा नवीन भाग तुम्हाला या शनिवारी नेटफ्लिक्सवर बघायला मिळेल.

टॅग्स :कपिल शर्मा चंकी पांडेफराह खानअनिल कपूर