'बिग बॉस OTT २'चा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) आता अभिनयाच्या जगात पदार्पण करत आहे. टीव्हीवर 'लाफ्टर शेफ्स' आणि इतर अनेक शोचा भाग झाल्यानंतर, तो त्याची पहिली वेबसीरिज 'औकात के बाहर' (Aukat Ke Bahar) मध्ये शिक्षण, प्रेम आणि रोमान्ससोबतच त्याचा राग बॉक्सिंगच्या रिंगमध्ये आजमावताना दिसणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
'औकात के बाहर' ही एक कॅम्पस ड्रामा वेबसीरिज आहे, जी आपल्या नावाप्रमाणेच स्वतःची ओळख निर्माण करण्याची कथा सांगते. एल्विश यादव साकारत असलेल्या राजवीर अहलावतसोबत ट्रेलरची सुरुवात होते, राजवीर हा हरियाणाचा नम्र तरीही प्रखर व्यक्तीमत्वाचा मुलगा आपल्या अवाक्यापलिकडली स्वप्न पाहत दिल्लीच्या उच्चभ्रू कॉलेजमध्ये पाऊल ठेवतो. फ्रेशर पार्टीमध्ये त्याची थट्टा झाल्यावर, तो त्याची सिनियर अंतरा शुक्ला हिला इंप्रेस करण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता पैज लावतो. अंतरा शुक्ला आत्मविश्वासू, राजनैतिक प्रभाव असलेली विद्यार्थिनी आहे, जी भावनांना आपल्यापासून मैलभर लांब ठेवते. अविचारी आव्हान लवकरच अधिकाधिक सखोल होत जाते, तसे राजवीरला अभिमान आणि भावनेच्या गुंत्यात अडकल्याचे जाणवू लागते आणि अंतराला ती महत्वाकांक्षा आणि आपुलकीमध्ये गुंतत असल्याचे लक्षात येते. कथेमध्ये पुढे आपण पाहतो की, राजवीर स्वतःला अहंकार आणि भावना यांच्यामध्ये अडकलेला पाहतो. दरम्यान, कॉलेजचे राजकारण त्याच्या शिक्षण, स्वप्ने आणि प्रेम या तिन्ही गोष्टींवर हावी होते.
एल्विश यादव म्हणाला, ''औकात के बाहर मला अतिशय प्रिय आहे कारण हा प्रेमकथेहून जास्त आहे. आत्मसन्मान, प्रामाणिकपणा आणि तुमच्याबद्दल लगेच मत बनवणाऱ्या जगात स्वत:ची जागा बनवण्याच्या राजवीरच्या प्रवासाची ही गोष्ट आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अॅमेझॉन एमएक्स प्लेअरपासून करायला मी अतिशय आतूर आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की प्रेक्षक माझ्याप्रमाणेच या कथेशी कनेक्ट होतील.''
मल्हार राठोड म्हणाली, ''अंतरा आत्मविश्वासू, महत्वाकांक्षी आणि न झुकणारी असली तरीदेखील त्यामागे शक्तीचा असुरक्षिततेसोबत समतोल साधण्यास शिकत असलेली मुलगीसुध्दा दिसते. औकात के बाहर प्रेम, निष्ठा आणि व्यक्तीगत धेय्यांना सुंदर चित्रीत करतो.'' 'औकात के बाहर' एमएक्स प्लेयरवर ३ डिसेंबरला प्रीमियर होणार आहे.
Web Summary : Elvish Yadav debuts in 'Aukat Ke Bahar,' a campus drama about Rajveer, a Haryanvi boy navigating a Delhi college, love, and boxing. Premieres December 3 on MX Player.
Web Summary : एल्विश यादव 'औकात के बाहर' से अभिनय की शुरुआत कर रहे हैं, जो एक कॉलेज ड्रामा है। इसमें हरियाणवी लड़का प्यार और बॉक्सिंग करते दिखेगा। MX प्लेयर पर 3 दिसंबर को प्रीमियर।