Join us

अशाप्रकारे 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात होऊ शकता सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 08:00 IST

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी.

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. या शोची रसिकांमध्ये क्रेझ पाहता मराठीतही हा शो सुरू करण्यात आला. कोण होणार करोडपतीचा तिसरा सीझन लवकरच सोनी मराठी वाहिनीवर दाखल होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे.नागराज मंजुळे या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन करणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ११ मार्चपासून ‘कोण होणार करोडपती’चं रजिस्ट्रेशन सुरू होत आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला मिस्ड कॉल द्यावं लागणार आहे. त्याची माहिती या प्रोमोमध्ये देण्यात आली आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फक्त एका तुम्हाला ‘मिस्ड कॉल’द्यायची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण अगदी बिनधास्तपणे समोरील व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मिस्ड कॉल देतो. त्याचप्रमाणे अचूक उत्तरासाठी तितक्याच बिनधास्त पद्धतीने मिस्ड कॉल देऊन या कार्यक्रमात सामील होण्याची संधी चुकवू नका. कारण उत्तर शोधले की जगणे बदलते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ११ ते २० मार्च या दरम्यान रजिस्ट्रेशन्स सुरु राहणार आहेत. त्यासाठी मिस्ड कॉल द्या 9164291642 किंवा सोनी लिव्ह (Sony Liv) ऍपवर रजिस्टर करा.

‘कोण होणार करोडपती’चे हे तिसरे पर्व आहे. पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर यांनी केले होते. तर दुसऱ्या पर्वात ती जबाबदारी स्वप्निल जोशीने पार पाडली होती. आतापर्यंत दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून नागराज यांना प्रेक्षकांनी पाहिले. आता सूत्रसंचालक म्हणून ते प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या नवीन पर्वात कोणकोणते नवीन बदल असतील आणि कोणत्या नवीन लाइफलाइन्स असतील हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

टॅग्स :नागराज मंजुळेसोनी मराठी