Join us

Watch Video : ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चे फर्स्ट साँग रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 16:32 IST

अनिल कपूर, सोनम कपूर आणि राजकुमार राव यांचा आगामी चित्रपट ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे अर्थात टायटल ट्रॅक आज रिलीज झालाय.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरवरून हा चित्रपटाची कथा समलैंगिक नात्यावर आधारित असल्याचे कळतेय.

अनिल कपूर, सोनम कपूर आणि राजकुमार राव यांचा आगामी चित्रपट ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ ब-याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पहिले गाणे अर्थात टायटल ट्रॅक आज रिलीज झालाय.९० च्या दशकात आलेल्या अनिल कपूर यांच्याच ‘1947 ए लव स्टोरी’ या चित्रपटातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. याच गाण्याच्या मुखड्यावर आधारित शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे टायटल ट्रॅकही कर्णमधूर आहे. या संपूर्ण गाण्यात राजकुमार राव सोनमच्या प्रेमात बेभान झाल्याचे दिसतोय. याऊलट सोनमच्या मनात दुसरेचं काही सुरु आहे.

रोचक कोहलीने या गाण्याला संगीत दिले आहे. रोचक कोहली आणि दर्शन रावेल यांनी हे गाणे गायले आहे. गुरप्रीत सैनीने या गाण्याला शब्दबद्ध केले. ओरिजनली हे गाणे आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केले होते आणि जावेद अख्तर यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते.

काही दिवसांपूर्वी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’चा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरवरून हा चित्रपटाची कथा समलैंगिक नात्यावर आधारित असल्याचे कळतेय. या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर आणि सोनम कपूर ही बापलेकीची जोडी पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. जुही चावलाही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. येत्या १ फेबु्रवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. शैली चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट विधू विनोद चोप्रा व राजकुमार हिरानी यांची निर्मिती आहे.गतवर्षी सोनम कपूरने आनंद अहुजासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचा हा तिचा दुसरा चित्रपट असणार आहे. लग्नानंतर लगेच ती ‘वीरे दी वेडींग’मध्ये दिसली होती.

टॅग्स :एक लडकी को देखा तो ऐसा लगासोनम कपूरराजकुमार रावअनिल कपूर