Join us

विराटची अनुष्का होणार 'बोलकी बाहुली'; चाहत्यांसोबत काढणार सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 15:33 IST

असे करणारी अनुष्का भारतातील पहिली स्टार असेल

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. लोखो चाहते अनुष्काची एक झलक पाहण्यासाठी आतूर असतात. अनुष्कासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते आतुर असतात. आता चाहत्याची ही इच्छा पूर्ण होणार आहे. कारण, सिंगापूरमधील मादाम तुसाद संग्रहालयात अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा होणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, मादाम तुसाद संग्रहालयात असणारी अनुष्का चाहत्यासोबत गप्पाही मारणार आहे. बोलका पुतळा असणरी अनुष्का भारतातील पहिली स्टार असेल.  

मादाम तुसाद संग्रहालयात मोजक्याच लोकांच्या पुतळ्यावर इंटरॅक्टिव फीचरचा प्रयोग केला जातो. फुटबॉलपटू रोनाल्डो, ओपरा विनफ्रे आणि लुईस हॅमिल्टन सारख्या आंतरराष्ट्रीय आयकॉनसोबत आता अनुष्का शर्माचा बोलका मेणाचा पुतळा असणार आहे.  

इंग्लंडबोरबरच्या दुसऱ्या टी-20 सामन्यावेळी विराट कोहलीची भेट घेण्यासाठी अनुष्का इंग्लंडमध्ये गेली होती. त्यावेळी विरुष्काची चांगलीच चर्चा झाली होती. 

टॅग्स :अनुष्का शर्मा