सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिचा पती विराट कोहली (Virat Kohli) आणि त्यांची मुलगी वामिका(Vamika)सोबत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. विराट आणि अनुष्का मीडिया आणि पापाराझीपासून दूर राहणे पसंत करते, परंतु ते अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच, विराट अनुष्काच्या व्हॅकेशनचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला. या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळाली.
अनुष्का शर्माने या व्हॅकेशनचा आणखी एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अनुष्काने वामिकाला फिरण्यासाठी सायकल भाड्याने घेतली आहे आणि वामिकाचा चेहरा लपवत सायकलचा फोटो शेअर केला. अनुष्काने ही सायकल भाड्याने घेतली असली तरी त्यावर तिच्या मुलीचे नाव वामिका लिहिले आहे.
आगामी प्रोजेक्टवर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का शर्मा लवकरच 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. झुलन ही भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे. जानेवारी २०२२ मध्ये अनुष्का शर्माने या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. अनुष्काचा हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.